अत्यंत मोहाविष्ट होऊन मी निजलों अर्से केवळ तमोविषयक स्मरण होतें तें तशाच अनुभवाचें कल्पक होतें. तो अनुभव बुद्धीचाच धर्म आहे; तीच निद्रा व जरी ह्या निद्रेमध्ये समाधिप्रमाणें चित्त एकाग्र होतें तरी ती निद्रावृत्ति तमोगुणप्रधान असल्याकारणानें योग साधण्याची इच्छा करणाऱ्याने तिचा निरोध केला पाहिजे. अर्से तात्पर्य आहे. ॥ १० ॥ स्मृतीचें लक्षण सांगतात. अनुभूतविषयासंप्रमोषःस्मृतिः ॥ ११ ॥ प्रमादिक पूर्वी झालेला जो अनुभव तो स्मृतीच्या बापाप्रमाणे आहे तेव्हां अर्था तच ज्याप्रमाणे बापाचें धन त्याच्या नंतर मुलाचें होतें त्याच प्रमाणें अनुभवाला जो विषय असतो तोच पदार्थ स्मृतींचाही स्वकीय विषय होतो. स्मृतीला हेतुभूत जो अनुभव त्याचा जो विषय नसेल तो अर्थात् स्मृतीला परधनाममाणें होईल व त्याचें ती ग्रहण करील तर तो संप्रमोष ह्मणजे चोरी होईल; ह्मणून अनुभूत जो विषय त्याच्याठायीं जो हा असंप्रमोष ( चोरी न करणें ) ह्मणजे अनुभवापेक्षां अधिक वस्तूचें ग्रहण न करणें, अनुभूत विषयाचंच फक्त ज्ञान होणें ह्याला स्मृति असें ह्मण- तात. मागें सांगितलेल्या वृत्तींच्या योगानें “घटज्ञानवानहमस्मि" ( मला घटाचें ज्ञान झाले आहे ) इत्यादि पौरुष ह्मणजे आत्म्याला झालेला बोध ज्याला अ- नुभव ह्मणतात तो स्वप्रकाश आहे, आपला आपणच विषयी व विषय असा होऊं शकतो, ह्मणून त्यापासून उत्पन्न झालेल्या संस्कारापासून अनुभव वि षयक स्मृति होते. ( स्मृतीला अनुभवसमानविषयकत्व उपपन्न होण्याक अनुभव स्वप्रकाश मानिला आहे.) आतां अशी शंका येत्ये कीं, आपले शरीर हत्ती वगैरे पशूंच्या शरीराप्रमाणें झालेले दिसणें वगैरे ज्या गोष्टी कधींही अनुभूत केल्या नाहींत त्यांचें स्वनामध्यें स्मरण कसें होतें? पण तसें नाहीं; ती स्मृतीच नव्हे तो विपर्यय आहे अर्से तात्पर्य ॥ ११ ॥ ७ प्रमाण विपर्यय व विकल्प हे रून प्रत्यक्षासारिखे भासतात ते स्वप्न जाग्रदवस्थेतच होतात त्यांच्याच अनुभवाच्या बलेक- अज्ञायमान आहेत विषय जीमध्ये ती निद्रा आणि प्र माणादि वृत्ति आहेत (अनुभव संस्कारद्वारानें) प्रयोजक जीच्या ती स्मृति जाणावी असे भोज बृत्तीत सांगितले आहे.
पान:पातंजल योगदर्शन.pdf/१८
Appearance