Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पांत घेण्यालाच इष्ट आहे ह्मणून त्यावर अतिव्याप्तिदोष नाहीं. ह्याच विपर्ययाचे अवांतर भेद अविद्यादिक पांच क्लेश आहेत असें पुढें सांगावयाचें आहे. ॥ ८ ॥ विकल्पाचें लक्षण सांगतात. शब्दज्ञानानुपातीवस्तुशून्योविकल्पः ॥ ९ ॥ नरशृंगादि शब्दाचें श्रवण झाले असतां, त्या शब्दांचा कांहींच अर्थ नसल्यामुळें बुद्धिवृत्ति निर्विषय जी अवश्य होत्ये तिला विकल्प असें ह्मणतात. ह्या विकल्पानें ज्ञात होणारा नरशृंगादि पदार्थ ह्या जगांत नसल्यामुळे हा ममाण होत नाहीं; तसेच ह्याचा बाध झाला असतांही हा अवश्य राहतो व व्यवहारांतही ह्याचा उपयोग होतो ह्मणून हा विपर्यय नाहीं. जसें चैतन्य हाच पुरुष ह्मणजे आत्मा असा अभेद निश्चय झाला असतांही पुरुष व चैतन्य त्यांच्या भेदाचें विकल्पात्मक ज्ञान होतें. भावाखेरीज अभाव हा निराळा पदार्थ नाहीं असा निश्चय झाला असतांही सर्वधर्माभाववान पुरुष आहे असें, सर्वधर्माभाव विशेषण व पुरुष- विशेषय ह्या दोहोंमधील भेदाचें विकल्पज्ञान होतें. असेंच, राहु शिरोरूप असलातरी राहूचें शिर असा भेदव्यवहार होतो, इत्यादि दुसरे विकल्प जाणावे. ॥ ९ ॥ निद्रावृत्तीचें लक्षण सांगतात. अभावप्रत्ययालंबनावृत्तिर्निद्रा ॥ १० ॥ कार्याप्रत जातो ह्मणजे कार्यरूपानें जो परिणाम पावतो तो प्रत्यय ह्मणजे हेतु येथें जाणावा. जाग्रदवस्था व स्वप्नावस्था यांच्या अभावाला ( ध्वंसाला) हेतु जो तमोगुण तो आहे आलंजन ह्मणजे विषय जिला अशी जी वृत्ति तिला निद्रा असें ह्मणतात. "वृत्तयः पंचतय्यः" ह्या सूत्रांतून वृत्तिशब्द अनुवृत्तीने येत असतां, पुनः वृत्तिशब्दाचें सूत्रांत उच्चारण निद्रा ह्मणजे ज्ञानाभाव असें जें कितीएक दर्शनकारांचे मत आहे त्याचें खंडन करण्याकरितां केलें आहे. उदाहरणार्थ, मी सुख।नें निजलों होतों असें जें एखाद्या निजून उठलेल्पा मनुष्याला स्मरण होतें तें, बुद्धिसत्व सहित तमोविषयक असतें ह्मणून स्वकारणीभूत स्वसमान विषयक अनु- भवाचें कल्पक होतें ह्मणजे निद्रेत तमोगुणानें आवृत सत्वगुणाचें परिणामात्मक मुख त्याचा अनुभव झालेला असतो ह्मणून तसें स्मरण होतें; नाहीं तर झाले नसतें. ह्या अन्वयव्यतिरेकावरून निद्रा ही वृत्ति अशी सिद्ध होते. मी दुःखांत निजलों होतों असें स्मरण रजस्तमोविषयक होतें तें तशाच अनुभवाचें कल्पक होतें. असेंच २