Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) आता एकाच चित्ताच्या क्षिप्तादिक अनेक भूमि कशा होतील, अशी शंका येते तिचें उत्तर हेच सांगतों कीं, चित्त है त्रिगुणात्मक आहे, ह्मणून त्या गुणांमध्यें कोणाचें आधिक्य कोणाचें साम्य या भेदानें अशा पांच अवस्था होतात. ह्मणजे चित्ताचाठायीं त्या सत्वगुणांशापासून उत्पन्न होणारे ज्ञानमुखादिक स्वाभाविक धर्म असतात, तसेच रजांशापासून व्यक्त होणारे प्रवृत्त्यादिक धर्म असतात, व तर्मोशापासून व्यक्त होणारे आलस्य दैन्य वगैरे धर्म असतात, ह्मणून चित्त हूँ सत्त्वरजस्तमोगुणात्मक आहे असा निश्चय होतो. त्यांत जेव्हां रजोगुण व तमोगुण हे सत्त्वगुणापेक्षां कांहीं दुर्बल असून परस्पर सारखे असतात तेव्हां त्या सत्त्वगुणाच्या मभावानें चित्त परमेश्वराच्या ध्यानाभिमुख होऊं लागतें तितक्यांत तमोगुणानें त्याच्या सत्त्वांशाचें किंचित् आवरण केलें ह्मणजे रजोगुणाच्या किंचित् मानल्यानें तें ऐश्वर्याची इच्छा करूं लागतें, व त्याला विषय आवडू लागतात अशा चित्ताला विक्षिप्त ह्मणतात. चित्तांत तमोगुणाचें प्राबल्य झाले ह्मणजे त्याला मूढ ह्मणतात. तेव्हां त्याच्याठायीं अश्रेय (अकल्याण) अधर्म, अज्ञान, वैराग्य नसणें, दारिद्र्य हे दोष उत्पन्न होतात येथे अज्ञान शब्दानें भ्रम व निद्रा हीं समजावयाचीं. रजो- गुण प्रधानाला क्षिप्तचित्त ह्मणतात, हे चित्ताचे क्षिप्त व मूढ दोन प्रकार सर्व माण्यांस साधारण असतात विक्षिप्त चित्त प्राथमकल्पिक योग्यांचें असतें. प्राथमकल्पिक, मधुभूमिक, प्रज्ञाज्योति, व अतिक्रांतभावनीय, असे चार प्रकारचे योगी असतात, त्यांचे प्रत्येकाचें लक्षण पुढे सांगितले जाईल. • जर चित्त तमोगुणरहित असून रजोगुणानें युक्त असले तरी त्यांत सत्त्वगुण प्रधान असला तर तें एकाग्र होऊं लागतें व तें ज्यानां संमज्ञात योग सिद्ध झाला आहे असे जे मध्यम योगी (मधुभूमिक व प्रज्ञाज्योति) त्यांचें असतें व तें धर्म ज्ञान वैराग्य व ऐश्वर्य (अणिमादिसिद्धि) या गुणांनी संपन्न होते. जेव्हां रजस्तमोमलरहित शुद्धसत्त्वरूप असे चित्त होते तेव्हां तें विवेकख्याति ( प्रकृति व पुरुष यांचामधील (भेदज्ञान) करून ईश्वराचाच साक्षात्कार ज्यांत आहे असें ध्यान उत्पन्न करितें, तें ध्यान धर्ममेघ असे प्रसिद्ध आहे त्यालाच योगी परमसंख्यान असेंही नांव देतात. पुरुषरूपचितिशक्ति ही अपरिणामिनी आहे, कारण ती अप्रैतिसंक्रमा ह्मणजे ५ प्रतिसंक्रम झणजे संचार (गमन) तो चितिशक्तिरूप पुरुषाला नाही असे वाचस्प ० अप्रतिसंक्रमा ह्मणजे संचाररहिता, जशी बुद्धिवृत्ति विषयाच्या ग्रहणा करितां व्यामत गमन