(१०४) नुकूलनीय ह्मणजे अभिमुख करण्यास योग्य व दुःखार्ने प्रतिकूलनीय तो भोक्ता आहे असे सिद्ध होतें. ॥ २४ ॥ इतक्या सूत्र मपंचानें जन्मादिकांची सिद्धि व चित्तांत मोक्ष योग्यवित्त का गर्ने याचा निश्चय करून कमें व सांच्या वासना यांचा प्रपंच म्हणजे विस्तार पूर्वी सांगून विज्ञानभिन्न द्रष्टरूप अर्थाच्या साधनाने परलोकादिकांचा विस्तार परलोकास जाणारा भोक्ता याचा निश्चय सूत्रकारानी करविला. आतां मोक्षाचें निरूपण करण्याकरितां मोक्षाला योग्य अधिकारी कोण त्याचें निरूपण करितात. विशेषदर्शिन आत्मभावभावनाविनिवृत्तिः ॥ २५ ॥ जन्मांतराच्या पण्याच्या बर्लेकरून कोणी विद्वत्पुरुषाला आत्मस्वरूपाच्या ठायींच भावना ह्मणजे जिज्ञासा होते ती अशी. "कोठे मी आहे, कोणाचा मी आहे, व कोठून मी आलो आहे " असा जो जिज्ञासु तो अधिकारी त्याला पूर्वोक्त वि. वेकेंकरून बुद्धि होऊन चिन्मात्र पुरुष भिन्न आहे तो मी असा जोविशेषदर्शी त्याची आत्मस्वरूप जिज्ञासा निवृत्त होते कारण इच्छेच्या विषयाचा लाभ झाला म्हणजे ती निवृत्त होण्यास योग्यच आहे. ज्या नास्तिकांच्या मतांत दे- हाहून किंवा बुद्धीहून निराळा भोक्ता नाहीं ह्मणून त्याची अनात्म्याच्याठायीं आत्मभावना दृढ होते ह्यास्तव तो अधिकारी नाहीं जो तत्वाचा जिज्ञासु तो अधिकारी असें तात्पर्य आहे. ॥ २५ ॥ आतां तत्वजिज्ञासूचें विशेष दर्शनानंतर चित्त कसे होतें अशी शंका येते म्हणून उत्तर सांगतात. तदा विवेकनिम्नंकैवल्यप्राग्भारंचित्तम् ॥ २६ ॥ पूर्वी बुद्धयादिक अनात्म्याच्याठायीं आत्मभ्रमदशेमध्यें जें चित्त विषयांत निमग्र झालेले व संसारच आहे माग्भार म्हणजे अवधि (सीमा) ज्याच्याठायीं असे झाले होतें तें चित्त विवेककाली निवृत्तभ्रम असा झालेल्या योगीचें विवेका कांत निम्न होर्ते. दृक् व दृश्य यांचा जो भेद तो विवेक तो आहे निम्न म्हणजे आश्रयभूमिरूप ज्याचा तें विवेकनिम्न म्हणजे विवेकनिष्ठ असे जाणावें, म्हणून च कैवल्प आहे प्राग्भार म्हणजे अवधी ज्याचा तें कैवल्यप्राग्भार म्हणजे कै- वल्यफल आहे शेवट ज्याचा अर्से तें चित्त धर्ममेघनामक व्यानाच्याठायीं न त्पर असे होतें. ॥ २६ ॥ ८४ भावना ह्मणजे स्वतसेची जिज्ञासा ती कोण मी होतों इत्यादि रूपा विज्ञा० कैवल्पाकडेच आहे प्राग्भार ह्मणजे आभिमुख्य ज्याचें असें विज्ञा०
पान:पातंजल योगदर्शन.pdf/११२
Appearance