( १०२ ) आतां जर चित्ताहून आत्मा भिन्न आहे तर बौद्धादि कोणी वादीजनांस चित्तच आत्मा असा भ्रम कसा होतो? अशी कोणी शंका करील तर चित्ताला सर्वार्थ ग्रहण सामर्थ्य आहे हेंच या भ्रमाला कारण होते असे समाधान सांगतात. द्रष्टृदृश्योपरक्तंचित्तंसर्वार्थम् ॥ २३ ॥ चेतनपुरुष हाच द्रष्टा, शब्दादिक अचेतन हे दृश्य, असा चेतनाचेतनात्मक सर्व अर्थ आहे विषय ज्याचा ते चित्त सर्वार्थ सणवतें साला चितिसांनिध्य झाल्याने तेही चितिसारखे झालेले द्रष्ध्व चिदुपरक्त होते तेव्हां द्रष्टविषयक होतें. इंद्रियादि द्वारानीं दृश्योपरक्त झालेले तें दृश्याकार होतें ह्मणून भोग्य शब्दादिक आहे आकार ज्याचा व सुखदुःखादि परिणामात्मक भोग आहे स्वरूप ज्याचें असे दृश्य जरी चित्त आहे तरी चित्पतिबिंबाच्या अभेदाच्या भ्र मानें चित्तच आत्मा असा सौगत बौद्धांस भ्रम झाला तो युक्तच आहे. जपा पुष्पादिक अर्थाच्या आकाराचें ग्रहण करणे हा स्वभाव ज्याचा असा जो उत्तम जातीचा स्फटिकमणी त्याच्यासारखें हैं चित आहे, साला दृश्याकाराची ग्रा- हिता आहे ह्मणून चित्तातिरिक्त अर्थ नाही असा विज्ञानवादी बौद्धाचा भ्रम आहे. याविषयांत अर्से विवेचन करावें कीं, चित्त है भोग्य आहे ह्मणून त्याचा भोक्ता त्याहून भिन्नच मानिला पाहिजे तो नित्योदित चित्शक्ति असा ह्मण- वितो चित्रशक्ती ही नित्योदिता व अभिव्यंग्या अशी दोन प्रकारची आहे त्यांत निसोदिता कूटस्थ चित्रशक्तीची प्रतिबिंबरूपा सुखादि सारूप्याला प्राप्त झालेली चित्तसत्वानें अभिव्यंग्या जी चित्रशक्ती तो भोग ह्मणवितो तो दोन प्रकारचा आहे चिदवसानतारूप एक, परिणामरूपी दुसरा यांत अभिव्यंग्या चि- च्छक्ती हा मुख्य पुरुपाचा भोग जाणावा प्राप्तचैतन्या जी बुद्धि तिचा जो सुखादि परिणाम तो दुसरा भोग जाणावा ह्यामकारें बुद्धि व पुरुष ह्यांचा भेद ८२ जसा एकच स्कटिकमणि दोन्ही बाजूला स्थापित जपापुष्प व इंद्रनीलमणि ह्यांचें प्रतिबिंबन व स्वकीयरूप मेळून त्रिरूपासारिखा होतो तर्फे चिचही आत्मा व विषय ह्यांच्या प्रतिबिंबनानीं ग्रहीतृ ग्राह्य ग्रहणात्मक होऊन तीन अवयवांच्या वस्तूसारिखें होतें. कोणी चित्तातिरिक्त बाह्यार्थ आहे परंतु चित्ताहून मिन्नद्रष्टा चेतन नाही असे मानणारे बैं- नाशिक बौद्ध आहेत. आणि दुसरे विज्ञानवादी आहेत यानी असे सांगितले की, "आत्मा- बुद्धेि व विषय ह्यांचा वस्तुतः अभेद असला तरी भ्रम करून ग्राह्म व ग्रहण ह्यांच्या भेदा- नी युक्त असा आत्मा भासतो त्यांचें असे सात्पर्य आहे की, चित्तालाच जर सर्वरूपता कारली तर पुरुष व बाह्यार्य ही मानण्याचे काही प्रयोजन नाहीं अनादिवासना वशे चित्ताचे स्वतःच अनंत परिणाम होतात अशा स्वीकाराचा संभव आहे जसे दुग्धा अध्यादि परिणाम होतात तसे असे विज्ञा०
पान:पातंजल योगदर्शन.pdf/११०
Appearance