Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्मणजे वृत्तींचा संस्कारमात्र राहिलेल्या निरुद्ध चित्तांत (शुद्धसत्त्वगुणात्मकांत) या सात्विकवृत्तींचाही लय होतो तो जाणावा. भाष्यकारांनी (व्यासानीं ) झटलें आहे कीं, ज्याच्या योगानें एकाग्र चित्ताच्याठायीं अनारोपित व शुद्धसात्त्विक अशा अर्थाचें तात्विक ज्ञान होतें, जो अविद्यादि क्लेशांचा नाश करितो ह्मणूनच कर्मरूप बंधनांस शिथिल ( निष्फल) करितो, व चित्तवृत्तींस लयाभिमुख करितो त्याला संप्रज्ञातयोग असें ह्मणतात ॥ १ ॥ आतां दोन्हीं योगांचें सामान्यलक्षण सांगतात. योगश्चित्तवृत्तिनिरोधः ॥ २ ॥ चित्तामध्यें रजस्तमोवृत्तींचा लय होतो त्याला योग ह्मणतात. रजस्तमो वृत्तींचा लय अर्से ह्मटल्यानें संप्रज्ञातयोगामध्यें जरी सात्त्विक वृत्ति असत्ये तरी त्याचेंही हैं लक्षण होऊं शकतें. ३ भाष्यांतील वाक्यामध्ये 'सद्भुत' असे पद आहे त्या पैकी भूत है पद आरोपित झणजे विकल्पित अर्थाचे निवर्तन करितें. निद्रावृत्ति ही आपल्या विषयीभूत अनारोपित तमामध्ये एक्राम्रा होते ह्मणून तीही अनारोपित आहे तिच्या वारणाकरितां सत् असे ह्मटलें; सत् झणजे शोभन, झणजे अत्यंत आविर्भूत सच्च, कारण तमाच्या अतिशयाला वेश हेतुता आहे ह्मणून तें अशोभन आहे; अर्से वाचस्पतिमिश्राचे मत आहे. जो एकाग्र चित्तांत राहून खया ध्येय वस्तूचे प्रकाशन करितो, अविद्यादि लेशांचा क्षय करितो, त्या कारणाचा उच्छेद झाल्याने बुद्धि व पुरुष यांच्या बंधाला कारणीभूत, धर्माधर्मरूपबंधने त्यांस अदृष्ट उत्पन्न करण्यास असमर्थ करितो, तसे असंप्रज्ञात योगाला परवैराग्योत्पत्तीने सुलभ करितो तो संप्रज्ञात योग जाणावा. असे विज्ञान मिक्षू० ४ शुद्धसत्व परिणामरूप में चित्त त्याच्या (परस्पर) अंगांगिभावाने परिणामरूप होणान्या उपा वृत्ती त्यांचा निरोध ह्मणजे बहिर्मुख करून होत आलेला परिणाम त्याचा विच्छेद हो- ऊन अंतर्मुखत्वेकरून उलट परिणामाने आपल्या कारणांत ( चित्तांत ) लप होतो तो योग. एकाग्रचित्त असतां बहिर्वृत्तिनिरोध होतो, निरुद्ध असतां सर्ववृत्तीचा व संस्कारांचा निरोध ह्मणजे लय होतो असा एकाग्र व निरुद्ध चित्ते यांच्या भूमींचा भेद आहे असे भोजवृत्तीत सांगितले आहे.