(९२) आता पूर्वजन्म मानणेच खोटें मग त्यांनी व्यवहितवासनाही अर्थात नाहींतच अर्से म्हणणारा जो चार्वाक त्यात सांगतात. तासामनादित्वंचाशिषोनित्यत्वात् || १० || त्या वासनांनां आनंतर्य (प्रमाणसिद्ध ) आहे इतकेंच नाहीं काय तर अना- दिखही सिद्ध आहे हा चकाराचा अर्थ आहे कशावरून तर सर्वदा मी असावें ( मरूं नये ) अशी मरण त्रासरूप, आशी म्हणजे इष्टवस्तु प्राप्तीची इच्छा नित्य आहे कोणत्याही प्राण्याला नाहीं असे नाहीं. येथे असा अभिप्राय आहे. प्राणी उत्पन्न झाला कीं साला कंपादिक उत्पन्न होतात यांनी अनुमित केलेला जो मरणत्रास जो तो द्वेष्य जे अनुभूत दुःख त्याच्या स्मृतीचा नियमानें कल्पक होतो ती स्मृती वासनेची कल्पिका होते ती वासनाही मरणजन्य दुःखानुभवा- ची कल्पॅिका होते तो अनुभव ह्या जन्मांत संभवत नाहीं ह्मणून जन्मांतराची कल्पना करितो अशी वासनांची अनादिव सिद्धी होते. आतां अशी शंका येते देह जर आत्मा नाहीं तर हा जन्ममरणत्रास कोणाला होतो? आद्यंत रहित जो आत्मा त्याला मरण भय नसावें ह्या शंकेचें उत्तर इतकेंच कीं, जन्ममरण- त्रास चित्ताला होतात अहंकारापासून व्यक्त झालेले अनादि वासनेनें युक्तचित्त तें विभू असले तरी साला त्यासा सूक्ष्म व स्थूल देहांचे संकोच व विस्तार एत- त्स्वभावात्मक वृत्तींचा लाभ है जन्म, त्या वृत्तीचा लय हे मरण आणि वृत्तिस- त्ताकालीं दुःखमय असा हा सर्व संसार आहे. ॥ १० ॥ ७१ उत्पन्नमात्र झालेला बालक अनुमानादि करूं शकत नाहीं तरी त्याला मरणत्रास दिसतो त्यावरून त्याला पूर्वजन्मीं मरणानुभव झाला आहे त्याच्या संस्काराने त्या मरणदुः- खाचे स्मरण होतें ह्मणून तो त्रास होतो स्मरणावांचून तो संभवणार नाही. विश्वाकाशासा- रिखें चित्त दें विभु आहे व प्रतिपुरुषाला भोग्य ह्मणून अनंत आहे " हे वरानने चित्ताकाशा व प्रसिद्ध आकाश ह्या दोन्ही करून अत्यंत विविक्त तें चिदाकाश जाण " ह्या अशा बाक्यावरून शास्त्रांत चित्त हें विभु आहे असा अंगीकार केला आहे, जर परिच्छिन मानिले तर ईश्वरोपाधि चित्ताला परिच्छिलत्वापत्ति आल्याने त्याला विभुत्व प्रतिपादन करणाऱ्या श्रुति, स्मृति व युक्ति ह्यांशी विरोध येईल. जे वैशेषिक “चित्त अणु, मानितात” त्यांच्याम तांत चक्षुरादिक इंद्रिये विरुद्धदेशस्थित असल्याकारणानें अनेक बद्रियांचाशीं एककालीं संयोग संभवत नाहीं ह्मणून पांची इंद्रियांपासून एककालीं पांचप्रकारची वृति णाला होत्ये अर्से अनुभव सिद्ध आहे त्याची उपपत्ति होणार नाही असेविज्ञान ●
पान:पातंजल योगदर्शन.pdf/१००
Appearance