पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 भावेही चांगलेच अस्वस्थ झाले होते. ! थिस इज नो गुड देशमुख. आय फिल एक्स्ट्रिमली सॉरी फॉर यू....'

 'सर, रोजगार हमीद्वारे शासनाने प्रत्येक प्रौढाला रोजगाराची हमी दिली आहे. जगण्याची हमी दिली आहे! नाही दिली ती माझ्यासारख्या मध्यम पातळीच्या अधिका-याला... सामाजिक आंच ठेवून काम करणान्या अधिका-याला. ही कसली हमी आहे सर? हॅरासमेंटची, की झापड बंद करून आपली कातडी बचावीत काम करण्याची? तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल सर, उत्तर ?'


☐☐☐

हमी ? कसली हमी ?/ ९७