पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ते तसे नेहमीच माझ्याकडे येतात. प्रत्येक वेळी काम असतंच असं नाही, बसल्या बसल्या ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना फोन लावतात. ते जिल्हाधिकारी वा कार्यकारी अभियंत्यांना रोजगार हमी मीटिंगच्या संदर्भात वा मीटिंगमधील निर्णयाच्या संदर्भात खडसावीत राहतात. या प्रकाराची सवय झाल्यामुळे अशा वेळी मी माझे काम करीत राहतो. आजही जेव्हा त्यांचं बोलणं संपलं, तेव्हा माझ्याकडे वळत म्हणाले,

 'जरा चहा मागवा, घसा कोरडा पडलाय. या इंजिनिअर्स लोकांना सारखं झापावं लागतं, कामच करीत नाहीत.'

 मी चहा मागवला. तो पीत पीत त्यांना मघा दादासाहेब जे बोलले त्यासंदर्भात माझ्या मनात घोळणारे विचार सांगितले व म्हटलं, ‘बप्पा, मी फार विचार केला आणि याच निष्कर्षाला आलो आहे की, जर आपल्याला जिल्ह्यात लोकांना काम द्यायच असेल, तर पाझर तलाव आणि बंडिंगची कामं प्रयत्न करूनही फार काही देता येतील असं वाटत नाही. हां, वनीकरणाची कामं बरीच आहेत; पण तेथे फार कमी मजूर ‘अॅबसॉर्ब' होतील. त्यामुळे काय करावं ही चिंता वाटते...

 आणि मग मी त्यांना सकाळचा होकण्र्याचा किस्सा, कोर्टातली मरखेल प्रकरणात वाढलेली तारीख व दादासाहेबांची उपोषणाची धमकी हे सारं सांगितलं. हे सारं सांगत असताना त्यांची शेरेबाजी चालूच होती. ‘तो आमदार, त्याला कोण विचारतो? होकण्र्यास त्याच्यामुळे शेतकरी संमती देतील? शक्य नाही ! साले गव्हर्नर्मट प्लीडर नुसते कुचकामी - आणि जजेस.. काही विचारू नका. ते स्वतःला गॉड समजतात, असं वाटतं ! उद्या कुणी देव जगामध्ये आहे की नाही?... असा का रेफरन्स केला तर त्यावरही ‘देव आहे' म्हणणा-या वादीच्या विरुद्ध स्टे देऊन त्यांना कोर्टाच्या अंतिम आदेशापर्यंत देवपूजा करू नये वा देव मानू नये असा अंतरिम आदेश देतील...'

 आणि ‘दादासाहेब - अपोझिशनचा माणूस खरा, पण चांगला आहे. त्याचा व माझा मतदारसंघ हा दुष्काळीच आहे. तो म्हणतो ते खरं आहे...' अशा त्याच्या कॉमेन्टस् चालू होताच.'

 ‘बप्पा, मी सीरियसली बोलतोय...' मी म्हणालो, 'काही प्रमाणात का होईना नॉन प्लान रोडची कामे सुरू करावी लागतील... कमिशनरकडे पाठवून ती मंजूर करुन


पाणी! पाणी!! / ८८