पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


गेली. खिडकी उघडताच पहाटेचा थंड वारा तिच्या उतरलेल्या व ताठरलेल्या चेह-याला स्पर्श करून गेला. त्या ताजेपणानं ती सुखावली...

 परसदारी जर्सी गाय संथपणे रवंथ करीत होती. तिच्या पुढ्यात मागल्याच आठवड्यात तगाई म्हणून मिळालेला वनखात्याचा चिपाड झालेला शुष्क चारा होता. पहिले दोन दिवस तर गाईनं त्याला तोंडही लावलं नाही. पण भुकेपोटी आता तिनं तोही गोड मानला होता... संथपणे ती त्या वाळक्या चा-याचं रवंथ करीत उभी होती!

| किती वाळली होती ही गाय ! दोन वर्षापूर्वी ती चव्हाणाच्या गोठ्याची शान होती. दररोज पाच ते सहा लिटर दूध देणारी; पण दुष्काळाच्या अस्मानी संकटाने तिची पार रया गेली होती. आता तिची सारी हाडं उठून दिसत होती... एकदम चिपाडं झाली होती...

 शहरी विचंवानं नांगी मारताच वेदनेचा जाळ हावा, तशी गजरा मनोमन विव्हळून उठली. तिच्या मनात कसले कसले विचार येत होते, की त्यांच्या स्वैरपिसाट गतीचा आवेग तिला पेलवेना. एका तिरमिरीत ती पुढे झाली आणि खिडकी बंद केली. वळून भिंतीवरचा विरलेला छोटा आरसा हातात घेऊन आपलं शरीर वेगवेगळ्या कोनातून निरखू लागली...

 तिच्या कानात पुन्हा एकदा हणमंताचे रात्रीचे बोल घुमू लागले, 'गजरे, काय अवस्था करून घेतलीस जरा पहा - हाडं हाडं लागताहेत नुसते ... मजा नाही येत पूर्वीसारखी... ती जर्सी गाय आणि तु दोघीपण हाडकलात...' आणि त्यानं तिला दूर सारलं होतं !

 तिच्या हातून आरसा गळून पडला. फुटायचाच तो, पण खाली तिनं दूर केलेलं पांघरूण होतं, म्हणून बचावला एवढंच !

 तिची नजर हणमंताकडे गेली. संथ लयीत तो घोरत होता. अंगावर फक्त लेंगा होता. त्याची उघडी, भरदार केसाळ छाती श्वासाच्या लयीनं खालीवर होत होती. त्या छातीत स्वतःचे मस्तक घुसळीत तो पुरुषी दर्प श्वासात खोलवर ओढून घेणं ही तिच्या सुखाची परमावधी होती !

 पण आजचा दिवस वेगळेच रंग घेऊन आला होता. त्याचे कालचे काळजात घाव घालणारे बोल अजूनही तिच्या कानात घुमत होते. त्यामुळे त्याचं उघडं, पीळदार शरीर पाहून नेहमी रोमांचित होणारी गजरा आज कड़वटली होती.

 त्याच्या लेखी तिचं वळसेदार शरीर एवढंच सत्य होतं. त्या सुडौल देहात स्त्रीत्वाची भावना असलेलं तिचं स्त्रीमन त्याला कःपदार्थ होतं !... लग्नानंतर आठ वर्षानी गजराला हे प्रकर्षानं प्रथमच जाणवत होतं. त्याच्या लेखी ती व जर्सी गाय

पाणी! पाणी!! / ३४