पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे३. बांधा
 ती आता लख्ख जागी आहे, पण उठायला मन होत नाहीय. डोळे चुरचुरताहेत...
 काल रात्री झोप अशी लागलीच नाही. ती ग्लानी होती. डोळे जडावून विसावले होते एवढंच.
 अंग कसं जडशीळ झालंय... मनाप्रमाणे साच्या शरीरातही एक अनिच्छा, एक विमनस्कता भरून आहे...

 गजराने मोठ्या प्रयासानं जडावलेले दुखरे डोळे उघडले. चांगलं फटफटून आलं होतं! आता उठायला हवं... घरचं सारं व्हायचं आहे...

 आणि ते करून रोजगार हमीच्या कामावर जायचं आहे...

 शरीराला आळोखेपिळोखे देत गजरा उठणार तोच हणमंताचा तिच्या शरीराभोवती हात पडला आणि झोपेतच त्यानं तिला कुशीत ओढलं... तीही तेवढ्याच सहजतेनं त्याच्या मिठीत शिरली...

 खरं तर काल रात्रीला रंग कसा तो चढलाच नव्हता. तो असमाधानी, ती बेचैन. तारा न जुळलेल्या त्या खोलीत रात्रभर ती एक ठसकी वेदना घेऊन तळमळत होती, तो मात्र कूस बदलून बिनघोर झोपी गेला होता.

 एक अनाम बेचैनी गजराला स्पशून गेली आणि झटक्यात तिनं तिच्याभोवती पडलेला हणमंताचा कणखर हात बाजूस सारला... आणि उठून ती खिडकीजवळ

बांधा / ३३