पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/168

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आपल्याला ताबडतोब तरळदला जायला हवं. प्रत्यक्ष गुरांची छावणी पाहता येईल च भीमराव नाईकांशी बोलता येईल. एखाद - दुसरी चौकटीची बातमीही मिळेल.


 दिनेश बसस्टैंडला आला आणि त्याला 'सलाम आलेकुम दिनेश साब!' असं अभिवादन आलं. त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं - समोर चाऊसशेठ उभे होते.

 ‘वालेकुम सलाम !' दिनेशनं प्रतिअभिवादन करीत विचारलं, 'क्या चल रहा है चाऊसशेठ?'

 ‘हमारा ठीक है.' चाऊसशेठ म्हणाले. 'आप कहाँ जा रहे हैं?"

 दिनेशनं आपण तरळदला जात असल्याचं सांगताच चाऊसशेठचे डोळे लकाकले. गेले आठ दिवस 'कुछ करना चाहिये' असं आपण स्वतःला बजावत होतो, तो क्षण आता आला आहे व खरंच काहीतरी करता येईल हे त्यांनी जाणलं !

 "ये बात है!' चाऊसशेठनं आपल्या स्वरात नसलेला कळवळा आणीत म्हटलं, 'गवर्नमेंट ने अकाल के लिए कितने डिसिजन लिए है, लेकिन प्रशासन नाकाम साबित हो गयी है. ये जानवर का मर जाना उसकी मिसाल है, चलो, मैं भी आता हूँ. मेरी गाड़ी से जायेंगे तरलद."

 दिनेश मारुती कारने जायला मिळणार यामुळे खुश झाला होता. कधीमधी असा योग यायचा.

 गाडीमध्ये चाऊसशेठनं दिनेशच्या वृत्तपत्राची जातकुळी व विचारसरणी माहीत असल्यामुळे त्याला व्यवस्थित ‘पंप' करायला सुरू केलं आणि प्रशासन कसं जातीयवादी बनलं आहे हे सांगायला सुरुवात केली आणि पुढे ते म्हणाले,

 'दिनेश, मैं मानता हूँ कि हमारे कलेक्टर भावे साब एक नेक अफसर है. लेकिन वे संघवालों की तरफ झुके नजर आते हैं. वर्ना उन्हें क्या जरूरत थी कि वे भिडे गुरुजी को तीन - तीन जानवरोंकी छावनियाँ दें....।

 दिनेशमधल्या वार्ताहराला चांगला मालमसाला मिळाला होता.

पाणी! पाणी!! / १६६