पान:परिचय (Parichay).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंथन । ८५

लिहिले आहे ते जबाबदारीने आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे. त्यांचा पिंडच मुळी चौरस अभ्यास करून समतोलपणे विवेचन करणारा आहे. बारकाईने माहिती गोळा करावी आणि ती सावधपणे मांडावी, हे त्यांना सहज साधले आहे. ही माहिती देताना शब्दाच्या उलगड्यापासून ग्रंथाच्या प्रामाण्यापर्यंत आणि नवेपाठ सुचविण्यापासून नवे विवेचन सुचविण्यापर्यंत सर्व वैविध्य त्यांच्याकडे आहे. तुकाराम महाराजांच्या एका अभंगातील पाठ त्यांनी महींपतीच्या आधारे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.


 (मंथन ले. सदानंद देहूकर, नगर जिल्हा ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय प्रकाशन, अहमदनगर.)