पान:परिचय (Parichay).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४. महानुभाव वाङ्मयाचे संशोधन

महानुभावांच्या वाङमयाचे आणि धर्म- संप्रदायाचे संशोधन आणि अभ्यास हा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाचा व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही विद्वान अभ्यासकांनी तर महानुभाव वाङमय हा आपल्या जन्मभराच्या व्यासंग- चिंतनाचा भाग बनवलेला आहे. आदरणीय डॉ. भाऊसाहेब कोलते हे अशा संशोधकांचे ज्येष्ठ नेते मानले पाहिजेत. मी स्वतः मराठीचा व महाराष्ट्राचा अभ्यासक म्हणून हे सारे साहित्य वाचतो. व्यवसाय प्राध्यापकाचा असल्यामुळे शिकवतोही. तेराव्या शतकातील साहित्याचे ज्येष्ठ नेते म्हणून माहिमभट्ट, नरेंद्र, भास्करभट्ट इत्यादीं- वर माझे प्रेमही आहे. पण सामान्यपणे मी महानुभाव साहित्यावर कधी लिहीत नाही. एकतर प्राचीन मराठी

वाङमयाचा मी संशोधक व मीमांसक नाही. दुसरे म्हणजे मी स्वत:ला ह्या क्षेत्रात लागणारा जो किमान अधिकार त्याचा, हक्कदार समजत नाही. हा छोटासा विवेचक लेख मित्रांच्या प्रेमाखातर लिहीत आहे. मजजवळ ह्या क्षेत्रात सांगण्याजोगे काही आहे, असे वाटत नाही.
अगदी अलीकडेपर्यंत सर्वसामान्य मराठीच्या अभ्यासकाला महानुभाव वाङमयाच्या विषयी काही माहीतच नसे. संप्रदायाविषयी फक्त विकृत आणि अर्धवट माहितीच असे. हंपी- विरूपाक्षच्या शंकराचार्यांनी दिलेले अभयपत्र व्यवहारात फारसे फलदायी ठरलेले दिसत नाही. आजही परिस्थिती अशी आहे की, आपण हिंदू< आहोत असा महानुभाव संप्रदायातील अनेकांचा दावा आहे. व हा संप्रदाय अवैदिक आहे असा संशोधकाचा