पान:परिचय (Parichay).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग । १७
 

चालीरीती आणि विधी हजारो वर्षे सार्वत्रिक व सर्व समाजाच्या म्हणून चालत आल्या, त्याच चालीरीती सार्वत्रिक न राहता काही धर्मगटांच्या, वरिष्ठ वर्गाच्या म्हणून तंत्रमार्गात येतात. तांत्रिकांच्या व्यवहाराकडे सामाजिक ऱ्हासाचा पुरावा म्हणून पाहणे निराळे आणि सामाजिक ऱ्हासाचे कारण म्हणून पाहणे निराळे. डॉ. गाडगीळ तंत्रमार्गाला -हासाचे कारण मानतात. हे त्यांचे म्हणणे मान्य करण्यासाठी या विधीचे उगम आर्येतरांच्या यातुविधीत आहेत ही नोंद पुरेशी नाही.
 भारतीय समाजजीवनाच्या सर्वांगीण ऱ्हासाला इ. सनाच्या आठव्या शतकापासून आरंभ होतो आणि हा ऱ्हास वाढतच जातो, ही घटना का घडते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजून मिळत नाही. डॉ. गाडगीळ जे नोंदवितात ते सारे सत्य मान्य करूनही मिळत नाही. जोपर्यंत तंत्रसाधना हे ऱ्हासाचे स्वरूप आहे या भूमिकेवरून आपण, ते ऱ्हासाचे कारण आहे या भूमिकेपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तंत्रविरोध हा सामाजिक उन्नयनाचा प्रयास आहे हे मत निर्विवाद ठरत नाही. '
 जगभरच्या सर्व आदिम जातींच्यामध्ये यातू आहे, यातुश्रद्धा आहेत, विधी आहेत. आपल्या भारतात वैदिक आर्यांचा यातुविधी यज्ञ आहे; तर आर्येतरांचा यातुविधी तंत्र आहे हे मला मान्य आहे. पण सामाजिक वास्तवाचा अजूनही काही भाग आहे. डॉ. गाडगीळांनी हा भाग पुरेसा रेखीवपणे मांडलेला नाही अशी माझी तक्रार आहे. आर्यांचे आगमन ही काही एका दिवशी, एका काळी अगर वर्ष-दोन वर्षांत घडलेली घटना नाही. या आर्यांच्या टोळ्या भारतात निदान सतत पाच शतके येत होत्या. या सर्व टोळयांचे यातुविधी सारखे असले तरी एकच नव्हते. आर्यांच्या भिन्न भिन्न समूहांत थोडे थोडे फरक होते आणि ज्या भारतात ह्या आर्य टोळया येत होत्या तेथील आर्येतरांचेही विविध प्रदेशांत वसलेले समूह होते. या आर्येतरांच्याही यातुविधींत थोडे थोडे फरक होते. आर्यांच्या टोळ्या असोत वा आर्येतरांच्या टोळया असोत, स्थूलमानाने त्यांच्यात कितीही साम्य असो तपशिलातील फरक प्रत्येक ठिकाणी असतो. या फरकाचे प्रमाण किती हा अनुमानाचा भाग आहे.
 भक्तिमार्गाचा उदय जग निर्माण करणारा ईश्वर, शासन करणारा व कृपा करणारा ईश्वर या सर्व कल्पनांच्यासह होतो. गाडगीळांचे म्हणणे असे की, या कल्पना अवैदिक आहेत. 'मीच ' देव निर्माण करते, देवांना शक्ती देते, जग निर्माण करते, जगाचे पोषण करते असे म्हणणारी देवता अंभृणी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येते. जे ऋग्वेदात येते, जे वैदिकांना मान्य आहे तेही अवैदिकांचे आहे, असे डॉ. गाडगीळांचे म्हणणे आहे. अवैदिकाच्या यातुविधीशीही विश्वनिर्मात्या देवाची कल्पना विसंगतच आहे. ती वैदिकांच्या यज्ञनामक यातुविधीशीही विसंगत आहे. पण आर्येतरांच्या टोळयांत यातुश्रद्धेशी विसंगत विचार जन्माला येतात तसे