पान:परिचय (Parichay).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२० । परिचय
 

पोषक प्रादुर्भाव झालेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आजपर्यंत कोणी पाडलेला स्वतंत्र प्रकाशझोत या ग्रंथात आहे. लोकनायक अणे यांच्या मते हा : अपूर्व व मौलिक आहे. प्रत्यक्ष लेखकाने मात्र हे नोंदविलेले आहे की, प्रस्तुत ग्रंथ प्रायः स्वातंत्र्यवीर सावरकर व पंडित सुंदरलाल यांच्या सुविख्यात ग्रंथांती उच्छिष्टेच वेचण्यात आली आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे. एकत्र या परस्परप्रशंसा समोर ठेवाव्यात यावर भाष्याची गरज नाही. एवढे मात्र मी केलेच पाहिजे की, या ग्रंथाच्या रूपाने स्वदेशाभिमानं जागा करणारी, देशप्रेमा प्रेरणा देणारी चरित्रे एका ध्येयवादी व्यक्तीच्या हातून लिहिली गेली आहेत व एक अवश्य वाचनीय ग्रंथ निर्माण झाला आहे.



 (१८५७ च्या वीर महिला :- ले. ह. वा. देशपांडे. प्रकाशक ठाकूर आणी कंपनी, अमरावती.)