पान:निर्माणपर्व.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे. पहिल्या तुकडीने आपला मोर्चा आता बदलला आहे. दरा-धडगाव रस्त्याच्या कामाची माहिती घेण्यासाठी दऱ्याला जायचे ठरले होते. तेथून जवळच असलेल्या उनभदेवाच्या गरम झऱ्यावर आंघोळी उरकाव्यात, बरोबर घेतलेला भाकरतुकडा खावा आणि परतावे असा विचार होता. पण आता उनभदेवाला येथूनच रामराम. सलसडीचे शिवार या तुकडीला खुणावत होते.


 पहिली तुकडी सलसाडीच्या शिवारात पोचते.
 सूर्य ऐन माथ्यावर असूनही वातावरणात जळजळ नाही.
 दुपारझोपेच्या गुंगीत पहुडलेला समोरचा निळासावळा सातपुडा !
 सलसाडी व्यसनमुक्त आहे. गाव गरीब असला तरी स्वावलंबी आहे. सुसंस्कृत आहे. अडीचशे वस्तीच्या या लहान टुमदार आदिवासी गावाचा सरपंच लिहितो :
अर्जदार : गनसिंग जंगू ठाकरे (सरपंच, सलसाडी, ता. तळोदे, जि. धुळे.)
विषय : तळोदे पो. चौकीतील पो. स्टाफच्या गैरवाजवी वर्तनाबद्दल.
मा. मॅजिस्ट्रेट साहेब तळोदे.

 मे. साहेब, वरील अर्जदार अर्ज करतो,की ता. ३१ जानेवारी १९७२ च्या मध्यरात्री नंतर साधारण ३। ते ३।। च्या सुमारास मी माझ्या घरी (मु. सलसाडी) झोपलो असता श्री. भामट्या सखा ठाकरे (पो. पा. सलसाडी) व जंगल सोसायटीचे वॉचमन श्री. मोहनसिंग सोन्या भिल व श्री. करणसिंग हरिराम ठाकरे हे माझ्याकडे आले व त्यांनी मला सांगितले, की श्री. करणसिंग हरिराम ठाकरे यांच्या शेतावर (स. नं. १३ सलसाडी) प्रतापपूर येथील सुमारे ४०-५० लोक, १५ गाड्या, छकडे व ४ पोलीस (नं. १९२, १७३, २८२) (आले आहेत ! ) त्या सांगण्याप्रमाणे मी व पोलीस पाटील श्री. भामड्या सखा ठाकरे व श्री. मोहनसिंग सोना भिल सकाळी चार वाजताच्या सुमारास त्या शेतावर गेलो. तिथे गेल्यावर श्री. दौलतसिंग तोडरसिंग रजपूत यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी आम्हास या भानगडीत न पडण्याची ताकीद दिली. श्री. दौलतसिंग याच्याबरोबर त्याचा भाऊ श्री. गुलजार तोडरसिंग रजपूत, श्री. रामसिंग खंडा रजपूत व श्री. नारायण नवलसिंग रजपूत हेही होते. मग आम्ही चौघे परत आलो.

 ता. १ फेब्रुवारीला आम्ही सकाळी ६ च्या सुमारास शेतावर गेलो. शेतावर लोक आणि पोलीस होते. आम्ही परत गावात आलो आणि श्री. करणसिंग हरिराम ठाकरे यांनी श्री. सुपड्या बापू ठाकरे यास सरळ ग्राम शांति सेनेच्या शिबिरात (पाठविले ! ) तेथे बरेच कार्यकर्ते होते व श्री. गोविंदराव शिंदेशी सर्व बोलणी केली.

निर्माणपर्व । ४४