पान:निर्माणपर्व.pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेकांच्या काठ्या हिसकावून घेतल्या. उल्हास राजज्ञ यांनी मार खाणारा शंकर धनगर याच्या अंगावर स्वत:स झोकून दिले. त्याला झाकून घेतल्याने त्याचे प्राण वाचले. राजज्ञ यांनाही यामुळे फटके बसले. अनेकांना शांत करून, पुन्हा मोर्चा संघटित करून, मोर्चा गावाबाहेर आला. झिपा राणा कोळी याला गुलाब शंकर पाटील, माधव शंकर पाटील, विजय संभाजी पाटील वगैरे लोक मारीत असताना श्री. बनकर (पोलीस इन्स्पेक्टर) हे फक्त पाहत होते. बनकर यांच्या बोलण्याने व वागण्याने वातावरण चिघळत होते. 'भाषण करता काय ?' असे म्हणून त्यांनी राजज्ञ यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर काठी मारली. यामुळे काही लोक बनकरांच्या अंगावर धावून गेले; पण त्यांना शांत करून राजज्ञ यांनी मागे फिरविले.

 ‘या हाणामारीत ताराचंद महादू नगराळे (दलित), बळीराम तानका कोळी, बुवा हिरामण भिल, झोपडू दगा सोनवणे आदी गरिबांना जबर मार बसला. बुला हिरामण भिल याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाल्याने त्याला सिंदखेडा येथे रुग्णालयात पाठवावे लागले. इन्स्पेक्टर बनकर यांनी ताराचंद नगराळे व सौ. सिंधू नगराळे यांना काठीने झोडपले. सिंधूबाईच्या हाताला हिसडा मारल्याने त्यांच्या बांगड्या फुटल्या. शांताबाई सोमा ईशी व बायजाबाई सदाशिव ईशी या दलित स्त्रियांना जातिवाचक शिवीगाळ करत ओंकार गिरासे, दिवाण हिरा ठाकूर यांनी लाथाबुक्क्यांनी तुडविले.


 आणखी काही नावनिशीवार तपशील सादर करून निवेदन शेवटी म्हणते : ‘एवढा अन्याय सहन करूनही सर्व गरीब मोर्चाने दहा किलोमीटर अंतर पायी जाऊन सिंदखेड्याला पोचलाच.' तेथे इतर गावाहून असेच छोटे-मोठे मोर्चे येऊन दाखल झालेले होते. कॉलेजच्या पटांगणावर सगळ्यांचे एकत्रीकरण झाले व नंतर हा संयुक्त मोर्चा गावातून हिंडून तहसीलदार कचेरीवर धडकला. अमळध्याच्या जमीनदार मंडळींचा व त्यांना आतून सामील झालेल्या पोलीसअधिकाऱ्यांचा डाव असा पूर्णपणे उधळला गेला. मोर्चा ठरल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला. मोर्चावर दोन हल्ले झाले. दोन्हीही हल्ले दलितांनी यशस्वीरीत्या परतवून लावले. ग्राम स्वराज्य समिती यापूर्वी शहादे-तळोदे भागातच काम करीत होती. या मोर्चामुळे सिंदखेडा भागातही समितीचे पाय रोवले गेले. अंबरसिंगांच्या मृत्यूनंतर समितीला थोडी मरगळ आलेली होती ती दूर झाली. अमळथ्याचा प्रश्न समितीने आता धसाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तिला साथ मिळणार का नाही ? शहरात कामगार-कारकुनांनी संप केला की, खेड्यातल्या असंघटितांच्या नावाने त्यांना झोडपण्याची फॅशन आहे; पण हा असंघटितांचा

-१४

अमळथे । २१३