पान:निर्माणपर्व.pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
 ५२    गालिचा प्रशिक्षण केंद्रे सुरू.
 ४०६४ हातमाग सुरू.
 ४५० गावांना पाणीपुरवठा योजना लागू करण्यात आली.
 २२०१ जागा, अनुसूचित जातीसाठी, समाज कल्याण खात्यामार्फत
चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहातून वाढविण्यात आल्या.
 ४८ लाख रुपयांच्या अधिक शिष्यवृत्त्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यां
साठी उपलब्ध झाल्या.
 १०३ विकासखंडातून एकीकृत ग्रामविकासाचा कार्यक्रम सुरू होत आहे.
 १०४ गावांना समग्र ग्राम विकास योजना लागू होत आहे.
 १६४८ गावांना वीज मिळाली.
 २०८८१ विहिरींना विद्युतशक्तीचा पुरवठा झाला.
 २२ कोटी रुपये रस्तेबांधणीसाठी...
  लाख लिटर दूध रोज गोळा होऊ लागले. यातून
 ८० हजार कुटुंबांना
 १५ कोटी रुपयांचे उत्पन्न किंमत रूपाने दिले गेले.

 १।२ दिवसांपूर्वी सर्किट हाऊसमध्ये घडलेली घटना. इथे बडे सरकारी अधिकारी, आमदार, खासदार, नेतेमंडळी उतरतात, राहतात. एका आमदाराची जीप रात्री पळविली गेली. दुसऱ्या दिवशी शोधाशोध केल्यावर ती सापडली.सर्किट हाऊसमध्येच उतरलेल्या एका प्रमुख व्यक्तीच्या मुलाने व त्याच्या काही मित्रांनी गंमत म्हणून ती रात्री पळविली व कुठे तरी सोडून दिली. हे आमदार पूर्वी किर्लोस्कर कंपनीत नोकरीला होते. नोकरी सोडून त्यांनी राजकारणात उडी घेतली व जनता लाटेत एकदम निवडूनही आले. असले प्रकार आता खूप वाढले आहेत, असे त्यांचे म्हणणे पडले. आणखी दोन - तीन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बोलण्यातही हा विषय वरचेवर येत होता. खरे तर राजस्थानात राजकीय अस्थिरता बिलकूल नाही. मी जयपूरला होतो, तेव्हाच दिल्लीत जनता पक्षाला हादरा देणाऱ्या घटना घडत होत्या. पण जयपुरात सादपडसाद उमटले नाहीत. मुख्यमंत्री भैरवसिंग शेखावत केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी एक-दोन दिवस अफवा पसरली तेवढीच घालमेल. येथे जाट आणि राजपूत अशी तेढ आहे आणि चरणसिंगांच्या अनुयायांची संख्याही कमी नाही. मुख्यमंत्री राजपूत आहेत आणि त्यांनी जाटांचा विरोध पूर्वीच मोडून काढून मैदान सपाट केलेले आहे. जाटांनी चालविलेले किसान आंदोलन तुरळक ठिकाणीच काय ते चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी जाट शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या

मुक्काम जयपूर, राजस्थान । १९१