पान:निर्माणपर्व.pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

& security. Here everyday, one tin would be braught from 1 Safdarjung Road, opened and the cash distributed by P. G. Sethi for two hours to the politically needy. The little Toyota was making sure that the money would survive to fight another battle one day. Indira Gandhi was not the person to give up.
 ( रायबरेलीत आपला व उत्तरेत सर्वत्र काँग्रेसचा धुव्वा उडाला हे। समजल्यावरही ) इंदिरा गांधींनी दोन दिवस राजीनामा दिलेला नव्हता. २२ मार्चला ‘१ सफदरजंग' आवारात एका चकचकीत टोयोटो गाडीत डबे भरले जात असलेले दिसत होते. डब्यात बहुधा नोटा असाव्यात. कारण निवडणुका चालू असताना असेच डबे या आवारातून ‘२ कुशक' मार्गावरील, कुंपण घालून सुरक्षित व बंदिस्त केलेल्या एका जागेत, रोज एक, याप्रमाणे नेले जात असत व पी. सी. सेठींकडून गरजूंना पैशाचे वाटप तेथून चाले.
 टायोटोतून ( नव्या ) सुरक्षित जागी हलवले जात असलेले धन पुढच्या एखाद्या लढाईसाठी उपयुक्त ठरणार होते...
 लढाई सोडून देणे हे इंदिरा गांधींच्या स्वभावातच नाही.)


 

 चकवाचकवीला उपयुक्त ठरतील अशी ३-४ आयुधे तर आजही इंदिरा गांधीजवळ शिल्लक आहेत. पहिले आयुध आहे त्यांची पुरोगामी लढाऊ प्रतिमा. त्या शंकराचार्यांना भेटायला जावोत किंवा टाटा-बिर्लाना सवलती जाहीर करत. गरिबांच्या, मागासवर्गाच्या बाजूने बेदरकारपणे लढणारी व्यक्ती अशी त्याची बँक राष्ट्रीयीकरणानंतर निर्माण झालेली प्रतिमा अद्याप काही पुसली गलेली नाही. या आपल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी त्या प्रतिकूल वातावरण असतानादेखील बेलछीला धडकून आल्या. त्यांनी हत्तीवरून केलेल्या प्रवासाची सुशिक्षितवर्गाने कितीही टवाळी केली व दातओठ खाऊन त्यावर टीका केली तरी यामागील इंदिरा गांधींचा हेतू साध्य होऊन जायचा तो जातोच. 'गरिबी हटाव' ही त्यांनी दिलेली क्रांतिकारक घोषणा खेड्यापाड्यांपर्यंत पोचलेली आहे. ‘गरिबी हटविण्यासाठी आणीबाणी आणली-आणावी लागली' हे पालपद तर यशवंतराव चव्हाणदेखील कालपरवापर्यंत आळवीत होते; पण यासाठी यशवंतराव किवा अन्य कुणी नेता प्रतिपक्षाशी-प्रस्थापिताशी लढायला तयार आहे. अशी प्रतिमा काही निर्माण होऊ शकली नव्हती-अजूनही नाही ! 'करिष्मा' (Charisma ) हा नेहमी लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा तयार होत असतो. हिंदुस्तान-

शंभर फुले उमलू द्यात । १७९