पान:निर्माणपर्व.pdf/177

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शंभर फुले उमलू द्यात शहर मुळात शांत आणि समृद्ध. रुंद रस्ते, प्रशस्त बंगले, बागबगीचे, झोपाळे, तुरळक रहदारी, यामुळे आणखीनच शांतसमृद्ध वाटणा-या भागातील एका बंगल्यासमोर आम्ही पोचलो. वेळही संध्याकाळची, शांतनिवांत. खासदार पी. जी. मावळणकर यांच्या ‘लास्की इन्स्टिट्यूट'चे कार्यालय सध्या या बंगल्यात आहे. पूर्वी अहमदावादच्या गजबजलेल्या मध्यभागात हे कार्यालय होते. नवीन व्यवस्था व्हायच्या अगोदरच ही मध्यवस्तीतील जागा सोडावी लागली. सध्या मावळणकरबंधूच्या एका बंगल्यातच ही तात्पुरती सोय म्हणून करण्यात आली. कधी वाहेरच्या हिरवळीवर, कधी आतल्या लहानशा, उभे राहिले तर डोके छताला टेकावे अशी 'उंची' असलेल्या खोलीत कार्यक्रम होत असतात. बहुधा व्याख्यानांचे. स्थानिक किंवा परठिकाणच्या आमंत्रितांचे. त्या दिवशी सकाळी वृत्तपत्रामध्ये 'स्थानिक' सदरात कार्यक्रम पाहिला. विषय ओळखीचा होता. मावळणकरांनाही भेटायचे होते. त्यांना घरी फोन केला तेव्हा नव्हते. म्हणून एकदमच सभास्थानी पोचलो. ते आलेले नव्हते. श्रोतेही कुठे दिसेनात. म्हणून पंधरावीस मिनिटांनी चक्कर मारून पुन्हा 'लास्की' जवळ आलो. दरम्यान सभा वरच्या खोलीत सुरू झालेली होती.
 लहानसा जिना चढून वर गेलो तेव्हा दारातच ' For members only अशी खडूने लिहिलेली पाटी होती. तिच्याकडे पाहिले न पाहिलेसे करून सरळ आत घुसलो. माझ्यासोबत चंद्रशेखर मराठेही होते. मावळणकरांचे भाषण नुकतेच सुरू झालेले होते. श्रोते असतील वीसबावीस.
 विषय होता Some books on Emergency- आणीबाणीवरील काही पुस्तके. ज्या पुस्तकांवर मावळणकर बोलणार होते ती ५-६ पुस्तकेही त्यांनी मागवून घेतलेली होती.

 एकेक पुस्तक हातात घेऊन वक्ते पुस्तकाचे नाव, लेखकाची ओळख वगैरे थोडक्यात करून देत होते. श्रोत्यांमधून, या विषयावर प्रसिद्ध झालेल्या

निर्माणपर्व । १७६