Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘शाळा नव्याने उघडल्या... नवा अभ्यासक्रम. तो मुलांना यथासांग शिकवायचा तर, मुलांनी जबाबदारीने वागायला हवे. बाकी सगळे कळले तरी तेवढे नेमके त्यांना कळत नाही. हवी तशी वागतात. आपापसात त्यांनी काहीही केले तरी हरकत नाही हो. पण ती शिची शिकवणाच्या बाईंना सतावतात. बाई तरी काय करणार? त्यांनी वर्गांतर्गत सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी नन्नाचा जाहीरनामा काढून त्याची मातेच्या कठोरपणे अंमलबजावणी केली. हसतखेळत शिकवायच्या नव्या पद्धतीनुसार मुलांना जे सांगायचे ते त्यांनी गाण्यात सांगितले. ते गाणे असे:
  मुलांनो मुलांनो
  बोलू नका बोलू नका
  मुलांनो मुलांनो
  हालू नका हालू नका 
  मुलांनो मुलांनो
  तापू नका तापू नका
  मुलांनो मुलांनो
  लपू नका लपू नका 
  खोकू नका.. शिकू नका
  रडू नका...ओरडू नका
  पाहू नका ..खाऊ नका
  नका..नका...नको
  नं ना निन्नी नुनू नेनै नौ नौ नंनः ।
 यावेळी अनंतराव सहीसलामत सुटले. पण नंतर मात्र ‘सोलकढी' वर सेन्सॉरचा फार बारीक डोळा राहिला. २ ऑगस्ट अंकातील 'लंकेच्या नकाशात भारत' या मजकुरावर ‘जाहीरनाम्या'चा सूड उगवला गेला आणि वरचेवर काटछाट ९ऊ लागली. एकदा तर काटछाट झालेला मजकूरही अंकात छापला गेला. पण तंबीवर भागले.
 २६ जुलै अंकामुळे सेन्सॉरच अडकले. ‘राजमुकुटाची चोरी' ही एक सत्य. या अंकात छापली आहे. सेन्सॉरने पास केलेल्या या कथेचा शेवट असा आहे-
 'इंग्लंडच्या राजमुकुटाच्या चोरीची ही काहीशी जगावेगळी हकीकत वाचून अपक वाचकांच्या डोक्यात काहीतरी यासारख्याच ओळखीच्या घटनेची याद येऊ

गली असेल. २४ मे १९७१ रोजीची दिल्लीत स्टेट बँकेची ६० लक्ष रु. ची 'हाणी वाचक अजून विसरले नसतील; पण वाचकहो, भलत्या शंकाकुशंका न

-११
चित्त हवे भयशून्य । १६५