पान:निर्माणपर्व.pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याच दिवाळी अंकातील डॉ. श्रीराम लागू यांचा 'अँटिगनी' हा नाट्यानुवाद कशासाठी होता? नाझीव्याप्त फ्रान्सला हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा 'अँटिगनी ने दिलेली होती. त्यावेळच्या अंध:कारमय कालखंडात ही प्रेरणा आपल्याकडेही जागती ठेवणे आवश्यक होते. पुढे 'अँटिगनी' संबंधी. उलटसुलट चर्चा वृत्तपत्रातून आली, तरी या प्रेरणेचे महत्त्व कोणालाच अमान्य झाले नाही. आता सांगायला हरकत नाही, हा डॉ. लागूकृत अँटिगनी-अनुवाद भूमिगत असताना मृणाल गोरे भाच्या वाचनात आला. माझी व त्यांची अशा स्थितीत एके ठिकाणी भेट झाली तेव्हा, हा अनुवाद लगेच प्रसिद्ध व्हावा ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली. दिवाळी १५/२० दिवसांवर येऊन ठेपलेली होती. पुष्पाबाई भावे यांनी मग धावपळ सुरू करून वेळेवर हे सर्व साहित्य 'माणूस' ला उपलब्ध करून दिले आणि अगोदर उरलेले बरेचसे कथासाहित्य रद्द करून हा संपूर्ण अनुवाद एकाच अंकात 'माणूस नेही प्रसिद्ध करून टाकला.
 पुढे हा सर्व अंकच आक्षेपार्ह' ठरला. मुखपृष्ठासकट. कारण मुखपृष्ठावर मानवाच्या स्वातंत्र्यप्रेरणेचे प्रतीक असणा-या, जिव्हारी जखम झाली तरी, आकाशात उच उच झेपावणाच्या गर्दीच्या ‘फाल्कन' ससाण्याचे चित्र होते आणि शिवाय या कवितेतील ओळीही
 A proud call to freedom ... to light ...
 the madness of the brave we sing
 अंकातील ‘संपादकीय' तर फारच ‘स्फोटक' ठरले. कारण त्यात रा. स्व. संघ जणि दसरा-विजयदिन यांचा संबंध जोडला होता. (तुकडे पृष्ठ )
 आणीबाणी २६ जून (७५) ला जारी झाली. २८ जून अंकावरील इंदिरा गधी न्यायदेवतेला वाकवत आहेत अशा अर्थाचे चित्रकारं फडणीस यांचे चित्र व ताल 'इंदिरा गांधींनी अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयानंतर राजीनामा द्यायला हरकत नाही' हे संपादकीय, प्रीसेन्सॉरशिपचा हुकूम हाती पडण्यापूर्वी छापून झाले हात या कारणास्तव सुटले. पण नंतरचा ५ जुलैचा अंक मात्र सापडला. मजकुरावर सिद्धीपूर्व नियंत्रण आले होते. पण रंगाबाबत लेखी सूचना नव्हत्या. म्हणून मुखपृष्ठावर सगळा काळा रंग घेतला आणि आत पहिल्या पानावर तीन सूचक अवतरणं देऊन या काळ्या रंगाचा अर्थ स्पष्ट केला. ही अवतरणे बाजारात उपलब्ध लल्या पुस्तकांतून निवडलेली होती. या पुस्तकांवर बंदी नव्हती. प्रीसेन्सॉरशिपची हुकूम नवीन मजकुराबाबत आहे, हे तर जुनेच साहित्य आहे-असा युक्तिवाद

"ता येण्यासारखा होता. पण या युक्तिवादाचा काही उपयोग झाला नाही 3च्या अंकाचे काम चालू असतानाच 'माणूस' कचेरीत पोलीस अधिकारी थडकले

चित्त हवे भयशून्य । १६३