पान:निर्माणपर्व.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना प्रणाम करून दुसरी वाट जयप्रकाश शोधू पाहत आहेत. त्यांचा हा प्रयत्न विनोबांनी निदान निकालात तरी काढू नये. त्यांच्या स्थानाचा जेवढा जयप्रकाशांना व त्यांच्या चळवळीला उपयोग करून देता येणे त्यांना शक्य आहे तेवढा तरी त्यांनी करून द्यावा. ‘सुसंवादा'चे नवे पर्व सुरू करून द्यावे. पुढचे पुढे पाहता येईल.

जानेवारी १९७६

'मनु'शासन पर्वाकडे । १२९