पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्योतिषी हवा की न्यायाधीश! संस्थेतून शिकून मोठी झालेली मुलं, मुली, महिला संस्थेइतकंच आपल्या सनाथ होण्याचे श्रेय दादांना देतात, यात सर्व आलं, दादांचं सर्व आयुष्य खरंतर आश्रममय झालं होतं. दादांचं खरं योगदान आश्रमाचं 'घर' करणं. अलीकडेच अचला जोशी यांनी 'आश्रम नावाचं घर' असं पुस्तक लिहिलंय. तत्पूर्वी 'आधारवड' हे दादांचं अविनाश टिळकांनी लिहिलेलं चरित्रही प्रकाशित झालंय. या सर्वातून प्रतिबिंबित होणारं दादासाहेब ताटके यांचं जीवन व कार्य म्हणजे महाराष्ट्रातील अनाथ मुले, मुली, महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्याचा आदर्श दीपस्तंभ! दादा ताटके यांच्यासारखा एक माणूस समाजाचे सहस्त्र दैन्य, दु:ख पेलत सहन करत राहतो. म्हणून समाजाचं अनाथपण सरत राहतं. दादा ताटके म्हणजे अनाथ महिलांचा आधारवडच!

•••

निराळं जग निराळी माणसं/७६