पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाल्य जपणारी फुलनदेवी : अनुराधा भोसले

 अनुराधा भोसले. वय वर्ष चाळीस. पूर्वी चाळिशी आली की, माणसाची दृष्टी अधू व्हायची अन् त्याला चाळिशी लागायची...चश्मा लागायचा; पण अनुराधाला चाळिशीत दूरदृष्टी लाभली ती सोशल शॉक्समुळे. पदरात कादंबरी व ग्रंथसारखी गोंडस मुलं असताना प्रेमविवाह केलेल्या नव-याला आपण 'नकोशी वाटणं' हे तिच्या लेखी न उमजणारं कोडं होतं. एक स्त्री म्हणून तिनं जे जगणं स्वीकारलं होतं ते स्वत:च्या...स्वार्थाच्या पलीकडचं विशाल जग होतं. ज्याचं कुणीच नाही त्यांचं कोणीतरी व्हायचं...आपण हरिजन कुटुंबात जन्मलो...वाढलो. ख्रिश्चन मिशनरी जीवनात आले नसते, तर माणूस जिणं आपणास लाभलं नसतं या विचारानं अनुराधानं माणूसपणाचं काम करायचं ठरवलं अन् ती एम.एस.डब्ल्यू. झाली. अनेक नोक-या केल्या. जळगाव जिल्हा परिषद, औरंगाबाद मिशन, बजाज ऑटो करत ती अरुण चव्हाणांच्या सांगलीच्या वेरळा विकास संस्थेत आली. तिथून तिनं अन्न, वस्त्र, निवाराचा हक्क मिळविणारी 'अवनी' गाठली. या साऱ्या प्रवासात ती सामाजिक काम करायची; पण ती नोकरी होती. पाट्याच टाकायचं काम करायची; त्यामुळे तिनं कुठलंही काम केलं तरी त्याला 'अनुराधा टच' असायचा... चाळिशीपर्यंचा हा तिचा प्रवास प्रवाहाबरोबर पोहणं होतं...तिचा घटस्फोट, तिला घरातून बाहेर काढणं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं यानं ती हैराण झाली. त्या दिवसात ग्रंथ झाला होता. तो अंगावर पीत होता नि या शॉकनं तिचं दूधच गेलं...ती सैरभैर झाली...काही सुचेना नि एक दिवस माझ्याकडे उतारा घ्यायला आली...मी तिच्या नवऱ्याला समजावलं; पण तो पुरुष होता...चाळिशीत

निराळं जग निराळी माणसं/१२२