Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता 'अमक्यावर प्रेम कर, ' 'ते अशाच प्रकारे आणि इतकेच कर, ' असे सांगून करायची गोष्ट आहे का ? परंतु खाडिलकरांच्या शुक्राचार्याला ते तसे आहे असे वाटते. शुक्राचार्याला एकवेळ वाटले, तर ते क्षम्य समजू. कारण अनेक पित्यांना ते तसे वाटत असेलही; परंतु देवयानीही कचावर प्रेम करते, ती पित्याच्या ' आज्ञेनुसार ' ही गंमतच आहे. 'बाबा, कचदेवावर प्रेम करीत जा, अशी आज्ञा ज्या वेळी आपण मला केली, त्या वेळी त्यांचा उपदेश ऐकत जा, अशीच आपली आज्ञा मला नाही का झाली?' (अं० १, प्र० १) शुक्राचार्य तर मुलीचा उपयोग करून देवेंद्राला जाळ्यात अडकवण्याचा राजकारणी डावच सरळ सरळ खेळत आहे. '... देवेंद्राच्या जाळ्यात देवेंद्राला अडकवावा, असा डाव त्यावेळी मी खेळत होतो आणि अजूनही तोच डाव खेळून यशस्वी व्हावे म्हणून मी एकसारखी धडपड करत आहे.' (अं० १, प्र० १) आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मुलाने आपल्या संप्रदायाचा स्वीकार करावा, त्यासाठी आपल्या मुलीच्या प्रेमाच्या (?) जाळ्यात त्याला अडकवावा आणि देवांच्या कल्याणासाठी संजीवनी घेऊन जाण्याची प्रतिज्ञा करून आलेल्या कचाला दैत्यगुरु शुक्राचार्याचा जामात म्हणून परंपरेने दैत्यगुरुचे पद वारसाहक्क म्हणून द्यावे. यामुळे एका दगडात दोन पक्षी त्याला मारायचे आहेत. एक तर आपल्या मुलीला चांगला रूपगुणसंपन्न नवरा मिळेल आणि दुसरी व महत्त्वाची फायद्यांची गोष्ट म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा डाव त्याच्यावरच उलटवून त्याच्या मुलालाच त्याचा कायमचा प्रतिस्पर्धी करून टाकता येईल. यात फायदा काय? तर दैत्यसंप्रदायाचा फायदा होईलच; पण त्याहीपेक्षा शुक्राचार्याला बृहस्पतीवर वैयक्तिक सूड उगवल्याचे समाधान मिळेल; नव्हे ते मिळवणे हेच त्याचे उद्दिष्ट आहे. तो ते स्पष्टच बोलून दाखवितो, ...(कच) माझा जामात या नात्याने माझ्यामागून दैत्य गुरुच्या आसनावर विराजमान होण्यास जर राजी झाला, तर देवयानी, अधिराजांनी देवेंद्रावर मिळवलेल्या विजयाहून फारच मोठा विजय या शुक्राचार्याने बृहस्पतीवर मिळवल्यासारखे होईल.' (अं० १, प्र० १) C या शुक्राचार्याच्या भाषणावरून त्याचे देवयानीवर फार प्रेम आहे असे वाटतच नाही. तो तिचा उपयोग आपल्या वैयक्तिक सूडाचे 'साधन' म्हणून करू पाहतो आहे, हे कटू असले, तरी सत्य आहे, हे त्याच्या भाषणातून आणि वर्तनावरूनच सिद्ध होते. त्याची संप्रदायावरची निष्ठाही वैयक्तिक अहंकारापोटी आणि स्वार्था- पोटीच निर्माण झालेली आहे. बृहस्पतीवर सूड उगवण्यासाठी म्हणून दैत्य- संप्रदायाचा उपयोगही केवळ साधन म्हणूनच करून घेत आहे. कारण अधिराज आणि देवेंद्र यांच्या जय-पराजयापेक्षा शुक्राचार्याने (व्यक्तीने) बृहस्पतीवर (दुसऱ्या नाटककार खाडिलकर ९३