Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकाशकीय आ - जच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणान्या ६१ लोकाग्रणींच्या व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्वाची गाथा या चरित्र ग्रंथमालेच्या रूपाने जनताजनार्दनाच्या चरणी सादर करताना मनस्वी समाधान वाटते आहे. - ‘श्री गंधर्व-वेद प्रकाशना'ची प्रकाशने प्रामुख्याने विद्यार्थी व शिक्षकवर्गाला उपयुक्त ठरतील अशी असतात. संदर्भमूल्य असणारी पुस्तके प्रकाशित करण्याचे वेगळेपण आम्ही सुरुवातीपासूनच शक्यतो जपत आलेलो आहोत. त्यामुळेच, महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सुवर्ण महोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी आगामी पिढ्यांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व मराठी भाषक जिज्ञासू वाचकांना उपयुक्त ठरेल असा कोणता एखादा ग्रंथनिर्मिती प्रकल्प आपल्या प्रकाशनातर्फे हाती घ्यावा, याबाबतचे विचारचक्र २००५ पासूनच मनात घोळत होते. त्याच दरम्यान इतिहासाचार्य वि० का० राजवाडे यांचे 'राजवाडे लेखसंग्रह भाग ३ संकीर्ण निबंध' हे पुस्तक वाचताना 'महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद' हा निबंध विशेष आवडला (मूळ लेख लोकशिक्षण (सातारा) शके १८३५ इ० स० १९१३, पृ० ३७७ ते ३८४) त्या लेखात वि० का० राजवाडे यांनी महाराष्ट्रातील सार्वकालीन महत्त्वाच्या अशा 'बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या' ४३ व्यक्तींची यादी दिलेली आहे. त्या सर्व व्यक्ती इसवी सन १८९३ ते १९१३ या कालखंडातील म्हणजेच एकोणिसाव्या शतकातील आहेत असे लक्षात आले. याच धर्तीवर, १९१४ ते २००५ या कालखंडातील लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांची गणना करून ती सूची अद्ययावत का बनवू नये, असा विचार मनात चमकून गेला. पटकन आठवणाऱ्या नावांची यादी केली, तेव्हा ८०-९० नावे पुढे आली. यादी तर तयार झाली. या यादीतील कित्येक नावे आजच्या पिढ्यांच्या केवळ कानावरूनच गेलेली आहेत, हे त्या यादीवर नजर टाकताच प्रकर्षाने जाणवले. मग, महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण आपल्या प्रकाशकीय ५