Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. सं० सावित्री (१९३३) - संगीत नाटक ९. सं० बायकांचे बंड (१९३५) - संगीत नाटक १०. सं० त्रिदंडी संन्यास (१९३६) - संगीत नाटक या दहा पौराणिक नाटकांपैकी तीन गद्य नाटके असून सात संगीत नाटके आहेत. प्रस्तुत टिळक युगापुरताच म्हणजे १९२० पर्यंतच्याच पौराणिक नाटकांचा विचार प्रामुख्याने करायचा झाला, तर या कालावधीतील १९२० मधील 'संगीत द्रौपदी' हे शेवटचे नाटक ठरते. त्यानंतरच्या पाच नाटकांपैकी खाडिलकरांचे वैशिष्ट्य आवर्जून ज्या नाटकात जाणवेल, असे नाटकच नाही. कारण १९२० पर्यंतच्या नाटकांतून खाडिलकरांचा पूर्ण प्रतिभाविलास आविष्कृत झालेला आहे. १९२० नंतरच्या 'सं० मेनका' (१९२६) पासून खाडिलकरांच्या नाट्यप्रतिमेला क्रमाने ओहोटी लागत गेल्याचे खाडिलकरांच्या सर्व समीक्षकांनी मांडलेले मत आहे. आणि ते खरेच आहे. 'सं० त्रिदंडी संन्यास' (१९३६) तर ' हेच का ते खाडिलकर ?' अशी शंका रसिकाला यावी, इतक्या सामान्य दर्जाचे नाटक आहे. १९२० पर्यंतची जी पाच पौराणिक नाटके आहेत, त्यापैकी 'कीचकवध' (१९०७) आणि 'सत्त्वपरीक्षा' (१९१४) ही दोन नाटके गद्य व 'सं० विद्याहरण' (१९१३), 'सं० स्वयंवर' (१९१६) आणि 'सं० द्रौपदी' (१९२०) ही तीन संगीत नाटके आहेत. खाडिलकर यांच्या नाट्यलेखनाचा आरंभच मुळी 'सवाई माधवरावांचा मृत्यू' (१८९३) या गद्य नाटकाने होतो. पौराणिक नाटकांपैकी पहिले 'कीचकवध' (१९०७) हे गद्य नाटकच आहे. त्यांच्या संगीत नाटकांचेही एक वैशिष्ट्य प्रथमदर्शनीच लक्षात येते. त्यांच्या एकूण सात संगीत नाटकांपैकी सहा संगीत नाटके पौराणिक कथानकांवरची आहेत आणि एकच ( ' मानापमान' ) काल्पनिक आहे. त्यांच्या गाजलेल्या संगीत नाटकात 'मानापमान'चा समावेश होतो. दुसरे गाजलेले संगीत नाटक म्हणजे 'सं० स्वयंवर' (१९९६). रुक्मिणी स्वयंवराची पौराणिक कथावस्तू असलेले हे नाटक संगीत नाटकांमध्ये 'सौभद्र'च्या खालोखाल लोकप्रिय झाले. यावरून १९०७ ते १९२० हा खाडिलकरांच्या ऐन उमेदीचा काळ ठरतो. किर्लोस्कर यांच्याप्रमाणेच खाडिलकरांवरसुद्धा मराठीत बरेच लिहिले गेले आहे. त्यापैकी काही मते तर सर्वमान्य म्हणूनच मानली जातात. खाडिलकरांच्या नाटकांचा विचार करताना अनेकदा माणसे नाट्य- प्रयोगासंबंधी फार लिहितात, असे वाटते. किर्लोस्कर यांच्यापर्यंतची नाटके अशी आहेत की, प्रयोगाखेरीज त्यांचा विचारच करता येत नाही. त्या नाटकांचे स्वरूपच मुळी असे आहे; मात्र १८६० नंतर जसजशी इंग्रजी नाटकांच्या भाषांतराची प्रवृत्ती ६८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर