________________
चालवत होते; तरी १९२५ मध्ये एक गंडांतर आले आणि 'हिंदू-मुसलमान' दंग्या- संदर्भातल्या एका लेखावरून काकासाहेबांना राजद्रोहाच्या खटल्यासाठी अटक झाली. टिळकांच्या वृत्तपत्रनीतीनुसार शक्यतो राजद्रोहाच्या आरोपात अडकू नये अशा बेताने; पण आपला मनोदय यथातथ्य वाचकांपर्यंत पोहचावा, अशा बेताने लिहिण्याच्या तालमीत काकासाहेब तयार झाले होते. तरी सरकारचे डोळे सदैव छिद्रान्वेषी असल्यामुळे दोषाचा ठपका ठेवण्याजोगी कारणेही शोधली जात असत. तसेच यावेळीही झाले होते. निमित्त झाले होते हिंदू-मुस्लीम दंग्याच्या निमित्ताने आलेल्या 'नवा काळ' मधील लेखाचे ! मुंबईला १८९३ मध्ये हिंदू-मुस्लीम दंगा झाला होता. त्यानंतर १९२५ मध्ये छत्तीस वर्षांनंतर हिंदू-मुस्लीम दंगा झाला. त्याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. 'पठाण मुले पळवतात, ' या अफवेमुळे हिंदू आणि मुसलमान दोघेही सुरुवातीला पठाणांना बडवत होते. नंतर मुसलमानांनी पवित्रा बदलला आणि पठाणांना सोडून हिंदूंना लक्ष्य केले. मुंबईला हा दंगा चालू असताना दिल्लीच्या सार्वभौम कायेदमंडळात दडपशाहीच्या नव्या कायद्याची चर्चा निघाली आणि त्यानिमित्ताने बोलताना गृहखात्याच्या अधिकाऱ्याने नव्या कायद्याची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी रशियाच्या बोल्शेविक पक्षाच्या राजतंत्राचा वारंवार उल्लेख केला. साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार होता. ते ध्यानात घेऊन कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, या बेताने लेख लिहिण्याबद्दल खाडिलकरांनी सहसंपादकांशी चर्चा केली. (न० र० फाटक, पृ० ३०) ९ फेब्रुवारी १९२५ रोजी हा लेख प्रसिद्ध झाला. पुढे तीनच दिवसांनी खाडिलकरांना अटक झाली. ज्या लेखासाठी अटक झाली, त्यात आक्षेपार्ह काही राहू नये, याची लेख वाचून खात्री करून घेतली होती. पकड़ वॉरंट घेऊन आलेला पारशी अधिकारी सौजन्यशील होता. त्या काळात काकासाहेबांना तंबाखूची तल्लफ येत असे. म्हणून काकासाहेबांना नेताना त्यांची चंची बरोबर घेण्यास त्याने आपण होऊन सुचवले होते. आक्षेपार्ह लेखाचे मूळ हस्तलिखित, मुद्रिते यांची कसोशीने तपासणी झाली. 'मी तोंडाने मजकूर सांगून दुसऱ्याने तो लिहून काढला, ' हे म्हणणे त्यांनी कायम ठेवले. कारण वृत्तपत्रीय लेखनात बहुधा ते तसेच करीत असत. दुसऱ्या दिवशी चीफ मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे काकासाहेबांना उभे केले. रीतसर खटल्याची सुनावणी सुरू झाली. जामिनावर सोडण्याबद्दल आणि खटला हायकोर्टाकडे पाठविण्याबद्दल वादविवाद सुरू झाले. मॅजिस्ट्रेट कशालाच कबूल वृत्तपत्रीय कार्य : केसरी ४३