________________
१ श्री. बालपण आणि जडणघडण कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे एक कार्यकर्तृत्वाचा प्रारंभ झाला आणि प्रामुख्याने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचे प्रथमपर्व (पहिली पंचवीस वर्षे) ज्यांच्या नावाचा ठसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर उमटला, त्या काही महत्त्वाच्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी काकासाहेब खाडिलकर हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. काकासाहेब खाडिलकर या नावाचा उच्चार सहसा मराठी माणसाच्या मनात अभावितपणे रूजलेल्या 'नाट्याचार्य' या विशेषणयुक्त पदाखेरीज उच्चारला जात नाही. 'नाट्याचार्य' हे बिरुद त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग आहे. कारण तो त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे, हे त्यांच्या चरित्राचा धावता आढावा घेतला तरी स्पष्ट होईल. त्याचबरोबर काकासाहेब खाडिलकर म्हटले की, 'केसरी'तले लोकमान्य टिळकांचे सहकारी; केवळ सहकारी नव्हे, तर टिळकांइतकाच जाज्वल्य देशाभिमान आणि त्यासाठी झिजणारी टिळकनिष्ठ लेखणी आणि वाणी, हे समीकरणही मराठी मनात रुजले आहे; किंबहुना त्यांच्या नाटकांच्या निर्मितीसाठीही त्यांची टिळकनिष्ठा हा एक जबरदस्त प्रेरणास्रोत आहे, हेही सर्वमान्य सत्य आहे. - तसा तर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वापासून प्रामुख्याने लो. टिळकांनी 'केसरी' वृत्तपत्र सुरू केल्यापासून (इ० स० १८८१) ते टिळकांच्या मृत्यूपर्यंतचा (१९२०) काळ हा टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटलेला महाराष्ट्राचा कालखंड होता, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. काकासाहेब खाडिलकरां- सारखे अनेक तरुण त्या काळात टिळकमय झाले होते. लो० टिळकांचे विचार आणि आचार यांचा खूप मोठा प्रभाव त्या काळातील मध्यमवर्गीय तरुणांवर होता. टिळक एक व्यक्ती नसून त्या काळची एक प्रभावी वृत्ती होती. ती अनेक व्यक्तींच्या रूपाने त्या काळात कार्यरत होती; मात्र त्या व्यक्तींपैकी ज्यांच्याकडे स्वतंत्र क्रियाशक्ती बालपण आणि जडणघडण १७