Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्राला जागे करता करता लोकमान्य टिळकांना जन्मभर हाडाची काडे करावी लागली. याचे कारण एवढेच की, लोकांची रुची पालटली. लोकांची द्रव्य देण्यास तयारी नाही. तुम्ही पैसे न मागता स्वार्थत्याग करा, त्यास त्यांची हरकत नाही ! याचे कारण लोकांची प्रवृत्ती बदलली, दानपद्धतीत फरक झाला. लोकाभिरुचीला नवे इष्ट वळण लोकांची रुची बिघडली होती; पण ती आता पुन्हा शुद्ध स्वरूपाकडे वळली आहे. परमेश्वराने ते विघ्न दूर केले आहे. आपले सामर्थ्य वाढवा, लोकसंग्रह करा, आपला भक्तिभाव सर्वांना मुबलक मिळेल, सुशिक्षित येतील, कीर्तने ऐकतील, हा हव्यास धरा व त्याच मार्गास लागा. या मार्गास अनुसरून असे वर्तन करा. . श्रीसमर्थ रामदास हे आपल्या संप्रदायाचे मोठे प्रवर्तक होते. त्यांचे सांगणे ध्यानात ठेवा. प्रबोधशक्ती स्वाधीन करून घेतली पाहिजे. बहुतांची मनोगते हाती घेतली पाहिजेत. सुशिक्षितांचे मनोगत जाणले पाहिजे व मनोगत ओळखून कार्याची दिशा ठरवली पाहिजे. लोकी जे केले, ते याने उलथवले. आपल्या देवता लोकांच्या मंदिरांत स्थापन करणे, अशी एक इंग्रजी म्हण आहे. लोकी जे तर्किले, ते दाविले निष्फळ करूनी. सुशिक्षितांच्या मनात उत्पन्न झालेल्या भावना निष्फळ करून दाखवल्या पाहिजेत व 'आमच्या कुळी असे समर्थ । आमच्या कुळी असे परमार्थ ॥ ' या समर्थांच्या उक्तीतील मर्म ओळखून आपल्यातील आकर्षणशक्ती या हरीची सेवा करण्याकरताच प्रकट केली पाहिजे. या सेवेचा अभाव म्हणजे अधःपातच होय. कीर्तन ही नवविधा भक्तीतील दुसरी भक्ती आहे. दास्य ही सातवी भक्ती आहे. परमेश्वराचे हे प्रेमाचे दास्य पत्करून सेवा करता करताच 'यादव हे सखा इति' या उक्तीप्रमाणे सखा या पदवीस मनुष्य प्राप्त होतो. सर्वस्वाचा त्याग करून देवाचे . दास्य केले पाहिजे. म्हणून प्राणाचे पतनही करावे लागले, जिवलगांची तुटी झाली तरी ती पत्करून परमेश्वराचे कार्य करावे. (दुष्टांचा), दुर्गुणांचा संहार करणे व साधूंना (सद्गुणांना) आधार देणे, हे परमेश्वराचे कार्य आहे. रामदासांचा समुदायांचा हव्यास धरा व प्रबोधनशक्तीने सुशिक्षितांची मनोगते हाती घेऊन कार्यास लागा. सुशिक्षितांची मने काबीज करण्याचे शस्त्र आज हरिदासांनी सुशिक्षितांना लहान मुले समजून त्यांच्या चालीने चालावे व त्यांच्या बोलीने बोलावे. दीडशे वर्षे इंग्रजी शिक्षणाने लागलेली सुशिक्षितांची बोबडी सवय हरिदासांनी समजून घेतली पाहिजे. बहुतांची मनोगते हाती घेतल्याशिवाय परिशिष्ट - २ । १२७