धृतराष्ट्र विदुरादी ज्येष्ठांना ती आपले म्हणणे आग्रहाने सांगते आहे. स्वातंत्र्य विरुद्ध दास्य अशा मूल्यांमधील हा संघर्ष द्रौपदी आणि दुर्योधन यांच्याद्वारे खाडिलकर मांडतात. भर सभेत द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या लाजिरवाण्या प्रसंगातून श्रीकृष्ण गुप्तरूपाने वस्त्रे पुरवून तिची अबू- रक्षण करतो. अखेर पांडव बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारतात. महाभारतातील या कथाभागाची मांडणी करताना खाडिलकरांनी परंपरेपेक्षा वेगळेपण दाखविले आहे. दुर्योधनादी कौरवांना सामान्यपणे काळ्याकुट्ट रंगात रंगविण्याची पौराणिक परंपरा आहे. या नाटकातील दुर्योधन बरेच मानवी गुणावगुण घेऊन उभा आहे. त्याचीही एक तार्किक भूमिका आहे. त्याला सत्ता-संपत्तीचा लोभ नाही. त्याच्या दृष्टीने 'मान' हे मूल्य मोठे आहे. राजसूय यज्ञात शिशुपालासारख्या सम्राटाला अग्रपूजेचा मान दिला नाही. एवढेच नव्हे, तर त्याचा भर सभेत कृष्णाने वध केला आणि कोणत्याच देशाचा राजा नसलेला, गवळ्यांच्या क्षत्रियापेक्षा हलक्या कुळातल्या श्रीकृष्णाला मात्र पांडवांनी अग्रपूजेचा मान दिला, हे शल्य त्याला टोचते आहे. द्रौपदीने यापूर्वी त्याचा सन्मित्र कर्ण याचा 'सूतपुत्र' म्हणून भर स्वयंवर मंडपात पाणउतारा केला, ते शल्यहीं त्याच्या मनात आहे. उग्रदर्पा द्रौपदीने पुन्हा मयसभेतील फजितीमुळेही हसून 'अंधपुत्र' म्हणून हिणवून त्याच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्या अपमानाने धुमसणारा दुर्योधन इथे आहे. द्रौपदीची विटंबना करायला तो उद्युक्त झाला आहे, तो या अपमानाचा सूड घेण्यासाठीच. एरव्ही तो कामलंपट म्हणून तिची अभिलाषा धरीतच नाही. केवळ एकवार 'मी कौरवांची दासी आहे, ' एवढे तिने कबूल करावे, हा त्याचा आग्रह आहे. दुर्योधनाला त्याची अशी एक तार्किक बाजू खाडिलकर देतात आणि त्याच्या विरोधात द्रौपदी उभी करतात. द्रौपदी स्वाभिमानी, स्वतःच्या सौंदर्याचा रास्त अभिमान, पतींच्या पराक्रमाचा अभिमान आणि श्रीकृष्णाच्या सख्यत्वाचा अभिमान - अशी स्वतंत्र अस्मिता असलेले तळपते व्यक्तिमत्त्व आहे. आपला सन्मान, आपली अस्मिता हा दुर्योधन आणि द्रौपदी या दोघांचाही आ मानबिंदू आहे. द्रौपदीला दास्य स्वीकारायला भाग पाडणे, हे दुर्योधनाचे उद्दिष्ट; तर प्राणपणाने स्वातंत्र्याचे रक्षण करणे, हा द्रौपदीच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. त्यातून हा संघर्ष उभा राहतो. 'दुर्योधनाचे व्यक्तिचित्र अत्यंत मोहक आहे,' असे वा० ल० म्हणतात. 'द्रौपदीचे चित्रही आपल्या मनाची पकड घेईल असेच आहे,' असेही ते म्हणतात आणि ' तरीही हे नाटक पुरेसे परिणामकारक होत नाही,' अशी तक्रार करतात. 'द्रौपदी'मधील नाट्याची उत्कटता अखेरपर्यंत टिकत नाही,' असे ते म्हणतात. याचे कारण काय ? वस्तुतः भीमसेनाचे व्यक्तिचित्रही लक्षणीय आहे. द्रौपदीच्या नाटककार खाडिलकर १०५
पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१०८
Appearance