पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षमताधिष्ठित व्हायचे तर जाणिवा स्पष्ट हव्यात. हा काळ आपण जाणिवा विकसित करण्यासाठी समर्पित करू या, तर उद्याचे स्वप्न साकारेल. काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद करताना, मी म्हटले होते की खरा शिक्षक तो, जो उद्याच्या शिक्षणाचा वेध घेत स्वत:ला समृद्ध करत राहतो. खरे शिक्षण ते, जे उद्याची आव्हाने ऐकत सावधपणे पुढची पावलं टाकत राहते. 'सावध ऐका पुढल्या हाका!'

◼◼◼

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९५