पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगणक साक्षर जन्मत असतील तर संगणक निरक्षर शिक्षक कालबाह्यच समजायला हवा. स्मार्ट बोर्ड, डिजिटल वॉल, थ्रीडी क्लास म्हणजे नवी शाळा. घर यंत्राने भरलेले मग शाळा मंतरलेली का ? ती पण नव यंत्र, तंत्रानी युक्त हवी.
 मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या त्या वेळचे सामाजिक पर्यावरण व शिक्षणविषयक जाणिवा भिन्न होत्या. जागतिकीकरणामुळे माणसाचे जिणे, जगणेच जागतिक झाले. सन २०४० साली अवतरणारे जग नक्कीच आजच्यापेक्षा प्रगत असणार. आजचा काळ आपण तेव्हा खऱ्या अर्थाने साजरा केला असे होईल, जेव्हा आपण २०४० च्या शिक्षणाच्या योजनांचा संकल्प आज करत उद्याच्या नव्या पायाभरणीस प्रारंभ करू. सन २०१५ नंतरचे अवतरणारे जे शिक्षणाचे विकासमान जग असेल. त्यावर 'युनिसेफ' या आंतरराष्ट्रीय संघटनेने आतापासूनच विचार करायला सुरुवात केली आहे. 'Global Thematic Consultation on Education in the Post-2015 Developmental Agenda' युनिसेफनी प्रकाशित केला आहे. त्यात उद्याच्या शिक्षणाचे अपेक्षित प्रतिबिंब आहे. ते स्पष्ट करताना म्हटले गेले आहे की, "There should be a reliable and disaggregated database linked to past and current data from nation's education system to effectively monitor progress towards the goals of the new agenda. Advance in technology and engagement with real-time data collection provide opportunities to avoid some of the monitoring limitations in the previous framework, such as the failure to focus on relevant, context-based, measurable and equitable learning outcomes, skills and competencies." यातून स्पष्ट होते की उद्याच्या शिक्षणाचे नियोजन करताना तुम्हाला काल, आज आणि उद्याचे भान हवे. ते भावनिक असता कामा नये. ते वस्तुनिष्ठ नि वास्तव हवे. अजून आपण आपल्या विद्यार्थी, शिक्षकांचा IQ, EQ काढत नाही. पाहात नाही. ज्यांना आणि जे शिक्षण देणार-घेणार त्यांची बौद्धिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक क्षमता व शक्यताच माहिती नाही. त्यांच्या विकासाचा आलेख तुम्ही काढणार कशाच्या आधारे ? तुमच्या जवळ सांख्यिकी माहिती (Database) हवा. तर तुम्ही उद्याचे रंगवणारे चित्र अपेक्षित यश (outcome) देणारे असेल. उद्याचे शिक्षण भविष्यलक्ष्यी, ससंदर्भ, मापनक्षम विद्याथ्र्यांचा समान विकास करणारे, कौशल्य व

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९४