पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यापक शिक्षण अत्याधुनिक असणे होय, याचा आपणाला विसर पडता नये. यासाठी सिंगापूरसारखा देश आपला आदर्श व्हायला हवा. फिनलंडसारखा छोटा देश जागतिक क्रमवारीत अव्वल असतो, तर आपण खंडप्राय असून का नाही? असा भुंगा आपल्या कानात सतत घोंगावला पाहिजे. हॉर्वर्ड विद्यापीठ जागतिक दर्जात वर्षांनुवर्षे अव्वल का राहते? असा प्रश्न जोवर आपणास बेचैन करून कृतिशील करणार नाही, तोवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आपणाकडे निर्माण होणार नाही.
 सदर पुस्तकात संदर्भ शोध, चित्रे इत्यादी साहाय्याबद्दल मी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. रवींद्र मिरजकर, प्रा डॉ. श्रद्धा पाटील, प्रा सुरेश संकपाळ या माझ्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूरमधील पूर्व सहकाऱ्यांचा ऋणी आहे. तद्वतच हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अक्षर दालन, कोल्हापूरचे अमेय जोशी यांचाही मी मन:पूर्वक आभारी आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे