पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३) प्राध्यापक (Professor)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%), १० वर्षे अध्यापन अनुभव, किमान API गुण
४) प्राचार्य (Principal)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%) पीएच.डी., १५ वर्षे अध्यापन अनुभव, किमान API - गुण
• API - Acadamic Performance Index
 शिक्षणशास्त्राचे सर्वमान्य तत्त्व आहे की शिक्षकास आपला विषय शिकविण्यासंबंधीचे पद्धतशीर वा शास्त्रोक्त अध्यापन शिक्षण (Pedagogical Education / Training) हवे. २०१३ साली आपल्या देशात २०० विद्यापीठे होती. पैकी एकही विद्यापीठ वैश्विक दर्जाचे नव्हते. त्याची कारण मीमांसा करताना आपणास लक्षात येईल की महाविद्यालये व विद्यापीठांतील शिक्षकांची पात्रता व दर्जा वैश्विक पातळीचा नसणे हे जसे कारण आहे, तसे येथील संशोधनही उच्च दर्जाचे नसणे हे कारण होय. सॅम पित्रोदा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सरकारने (युपीए) नॅशनल नॉलेज कमिशनची नियुक्ती केली होती. त्यांनी भारतातील पी.एच.डीवर स्वतंत्र अहवालच सादर करून पदव्यांच्या दर्जावर क्ष किरण टाकले आहे.
 युरोप खंडातील देश उच्च शिक्षणात आघाडीवर आहेत. तेथील शिक्षणाचा दर्जा युरोपियन कमिशन ठरवते. तेथील उच्च शिक्षणाच्या आधुनिकीकरणासंबंधीचा एक अहवाल नुकताच माझ्या वाचनात आला. 'Report to the European Commission on improving the Quality of Teaching and Learning in Europe's Higher Educational Institutions.' (June, 2013) सदर अहवालात उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसाठी खालील महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. ती अशी "All Staff teaching in higher education institutions in 2020 should have received certified pedagogical training. Continuous professional education as teacher should become a requirement for teacher in the higher education sector." (Page - 31, Rec. No. 4) अध्ययन हे जसे शास्त्र आहे तसेच अध्यापनही. अध्यापन पद्धती शास्त्रोक्त हवी. ती रामभरोसे अथवा व्यक्तीची मर्जी व मर्यादा राहील तर मिळणारे शिक्षण म्हणजे आनंदीआनंदच असणार हे उघड आहे. अध्यापन तंत्रात अध्यापन पद्धती समजावून घेऊन तिचे वारंवार प्रात्यक्षिक व प्रयोग, उपयोग करणे महत्वाचे असते, त्यातून

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८१