पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकत राहणार? त्याला केव्हातरी आरशासमोर उभारून प्रश्न करावाच लागेल की 'मी माझे कर्तव्य विवेकाने व कर्तव्यबुद्धी निभावतो का ? अभ्यासक्रमाची पूर्तता हा शिक्षकी पेशाचा वैधानिक भाग व बाब आहे, त्यापलीकडे तो रचनात्मक, विधायक भूमिकेतून आकृतिबंधाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी घडणीकडे - त्याच्या नागरिक भूमिकेकडे लक्ष देणार का?' शिक्षक स्वयंप्रेरित, ध्येयवादी असणे आता काळाची गरज आहे. भारतासारख्या गरीब देशाने शिक्षकाना गरीब ठेवलेले नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ व स्पष्ट असताना विद्यार्थी-पालकांच्या पुन:भरणात (Feed-Back) शिक्षक मागे का? तो अपेक्षांना पूर्ण का उतरत नाही, याचा विचार शिक्षक अंतर्मुख होऊन जोवर करणार नाही, तोवर अभ्यासक्रम, प्रशिक्षण हे वरवरचे व बाहेरील बदलच ठरतात. गरज आहे, शिक्षकांच्या स्वयं कायाकल्पाची!

◼◼◼


संदर्भ :-
 • (भारत सरकार, अध्यापक शिक्षण विभाग) www.teindia.nic.in
 • संकेतस्थळ - NCTE (www.ncte-india.org)
 • संकेतस्थळ - NCERT (www.ncert.nic)
 • Indian Journal of Applied Research - Vol -4 / Issue 5 / May, 2015
 • Educational Leadership - Dec. 2010 / Jan.-2011/Vol. - 68 / Issue - 1
 • Revue Web - 22 Oct, 2009
 • National Curriculum Framework - 2005
 • Syllabuses for Two Year Courses.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७९