पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या पुस्तकातील लेख शिक्षण व शिक्षक विकासाचा आग्रह धरते. मला हा देश म्हणजे 'गया बीता' वाटत नाही. येथील शिक्षण व शिक्षक जागतिक दर्जाचे असावे असे वाटते. गुणात्मक शिक्षण हे प्रयोग, संशोधनातून उदयाला येते. त्याला फार कमी वाव आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे, या ग्रंथातील 'नवे शिक्षण' विभागात बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाच्या प्रत्येक स्तराचे विवेचन आहे. शिवाय अध्यापक शिक्षणावरही विचार करण्यात आला आहे. स्त्री शिक्षणाचा ऊहापोह आहे, तसेच शिक्षणाच्या वाढत्या व्यावसायीकरणावर चिंता व्यक्त करून काही उपायही सुचविण्यात आले आहेत. तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा आग्रह अशासाठी की आपले आजचे मौखिक शिक्षण क्रियात्मक व विद्यार्थी सहभागी करून घेणारे व्हावे. कारण त्याशिवाय ज्ञानरचनावाद यशस्वी होणार नाही. भारतीय शिक्षणावर होणाऱ्या जागतिकीकरणाचे परिणाम विशद करून चक्रव्यूह भेदण्याचे आवाहन या पुस्तकात करण्यात आले आहे.
 'नवे शिक्षण' हे 'नवे शिक्षक' घडले तरच यशस्वी होणार, हे लक्षात घेऊन दुसऱ्या भागातील अकरा लेखांतून नव शिक्षकाच्या बदलत्या पात्रता, साधने, कौशल्ये, उपक्रमशीलता, अंकीय साक्षरता (Digital Literacy) , नवी अध्यापन पद्धती (New Pedagogy) ३० बाबत पारंपरिकेस छेद देणारे आग्रह आहेत. नवा प्रशिक्षित होणारा शिक्षक अजून गुंडाळी फळाच वापरणार असेल तर त्याच्या हाती लॅपटॉप येणार केव्हा? स्लाईड प्रोजेक्टर जाऊन अध्यापक महाविद्यालयात थ्रीडी तंत्रज्ञान, फोरजी, जीपीएस, व्हर्च्युअल एज्युकेशन, ऑनलाईन अभ्यासक्रम आल्याशिवाय शिक्षक आधुनिक बनणार कसा? अजून अध्यापक महाविद्यालयातील मेथड मास्टर जर लेसन नोटमध्येच अडकून असतील तर ते 'One Note' तंत्रज्ञान केव्हा वापरणार? असा प्रश्न आहे. ब्लॉग्ज, लिंक्स, सॉफ्टवेअर, विकीज, प्लॅटफॉर्म, फोरम, ऍनिमेशन, व्हिडिओज या तर झाल्या सामान्य गोष्टी. 'नवशिक्षकाची अंकीय साक्षरता' लेखात जी आधुनिक साधने स्पष्ट केली आहेत, ती किती अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षक अध्यापक, प्राध्यापकांना माहीत आहेत? ती ते स्वतः वापरतात काय? मग प्रशिक्षकांना ती साधने अवगत होणार. अशा अंगांनी आपण अध्यापक शिक्षणाकडे पाहायला हवे. शिक्षणात गुणवत्ता येण्याचे महाद्वार म्हणजे