पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६८% प्राथमिक तर ५७% माध्यमिक शिक्षकच प्रशिक्षित आढळले. म्हणून प्रशिक्षण संस्था वाढवल्या. पण गुणवत्तेस घसरण लागली. यावर उपाय म्हणून नवे राष्ट्रीय अभ्यासक्रम अमलात येत आहेत.
प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील बदल
 प्राथमिक शिक्षकांच्या घडणीत बाल्य व बालक समजून घेण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या भारतीय प्राथमिक शिक्षकास भारतीय समाजमन व संस्कृती माहीत असणे अपेक्षित आहे. बालक संगोपन व शिक्षण प्रक्रियेची मूलभूत माहिती नव्या शिक्षकांना दिली जाणार आहे. भाषा (मातृभाषा, प्रादेशिक) विज्ञान समाजशास्त्र, इंग्रजी अनिवार्य, गणित मूळ पाहावे. या विषयांच्या अध्यापन पद्धती शास्त्र (Pedagogy) अनिवार्य विषय असतील. पूरक विषयात नाटक, ललितकला, आरोग्य, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, योगाचा अभ्यास अपेक्षित आहे.
 या प्रारंभिक प्रशिक्षण, शिक्षणानंतर दुसऱ्या वर्षी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, समाजधारणा, लैंगिक समानता, सामाजिक समावेशन, स्वयंविकास (व्यक्तिमत्त्व), इंग्रजी लेखन, उच्चारण, प्रावीण्य, पर्यावरण, माहिती व संपर्क साधन तंत्रज्ञान (ITC), मुलांचे शारीरिक, भावनिक आरोग्य या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे.
 दोन्ही वर्षी पाच-पाच महिन्यांचे क्षेत्र अनुभव कार्य (Fieldwork / Internship) अनिवार्य राहणार आहे. नव्या अभ्यासक्रमात दोन बदल महत्त्वाचे राहणार नवा अभ्यासक्रम पूर्ण करणारा प्राथमिक शिक्षक इंग्रजीवर प्रभुत्व असणारा असेल. तो संगणक, इंटरनेट कुशल असेल. पर्यावरण, लिंग समानता व सामाजिक समावेशन भाव यामुळे तो शिक्षक म्हणून समतोल व समावेशी मन घेऊन शाळेत येईल. त्याला मुलांच्या सर्व बाबींची समग्र माहिती असेल तो सर्व शालेय विषयात पारंगत असेल. त्याचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व उन्नत असेल यावर भर देण्यात आला आहे.
 यानुसार शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा, साधने, प्रशिक्षक प्राध्यापकांचे प्रशिक्षण, पात्रता उंचावण्याची काळजी घेण्यात आली आहे. या महाविद्यालयात मनुष्यबळ वाढ अपेक्षित असून कार्यपद्धतीतही आमूलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. आदर्श आणि व्यवहार यातील शिक्षण क्षेत्रातील दरी अरुंद राहण्यावरच नव्या आकृतीबंधाची यशस्विता अवलंबून आहे.
माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील बदल :
 नव्या माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे तीन विभाग आहेत

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७७