पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाटील यांनी सन १९८३ साली विना अनुदान तत्त्वावर शिक्षण संस्था सुरू करण्याचे धोरण स्वीकारून तसा कायदा करून शिक्षण शासकीय काचातून मुक्त केले. आज शिक्षणाला व्यवसाय व बाजाराचे रूप आले आहे त्याचे बीज त्या धोरणात आढळले. प्रारंभी व्यावसायिक शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी विशेषतः इंजीनिअरिंग, मेडिकलसाठी हे धोरण अंगीकारले गेले, त्यात शासकीय गुंतवणूक, तरतूद वाचलीच पण डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, सिंबॉयसीस इत्यादींच्या यश व फायदेशीर कमाईकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष गेले व जवळजवळ सर्व मंत्री, आमदार, खासदार यांनी आपापल्या मतदार संघात, साखर कारखाना साईटस् वर शिक्षण संकुले उभारणे सुरू केले. प्रवरा, राजारामबापू, वारणा अशी उदाहरणे म्हणून सांगता येतील. शिक्षण हा देणगी, फी वर वाढणारा किफायतशीर व्यवसाय आहे असे लक्षात आल्यावर राजकीय मंडळींनी बी.एड. कॉलेजीस, समाजशास्त्र महाविद्यालये, तंत्र संस्था, व्यवस्थापन संस्थांतून D.Ed., B.Ed., M.Ed., M.S.W., M.B.A., B.B.A., B.C.A., M.C.A. चे अमाप पीक काढायला सुरूवात केली. त्यातून पैशाची चटक लागल्याने पुढे प्रवेश क्षमता (सीटस्) वाढवून घेण्याचा सपाटा लावला, 'छोटा मासा, मोठा मासा' स्पर्धा जीवघेणी झाली तशी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, आश्रमशाळा करत हा बाजार आता प्रत्येक घरातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या मराठी शाळांना लागलेली घरघर सर्वप्रथम ऐकू येऊ लागली, ती तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या पहिलीपासून इंग्रजीची सक्तीसारख्या लोकानुनयी निर्णयातून. आज तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जितकी सहज परवानगी मिळते, तितकी ती मराठी माध्यमांना मिळत नाही.
 गुदस्ता वर्षाच्या बाजारात झालेला फायदा लक्षात घेऊन आता शासनाने शिक्षणात निर्गुंतवणुकीचे अघोषित धोरण स्वीकारल्यात जमा आहे, त्याच पुरावा म्हणजे स्वयंअर्थशासित शिक्षण संस्था धोरण. इथेही साप-मुंगसाचा खेळ शासनाने मांडला आहे. ज्यांच्याकडे एकरावारी जागा त्यांना प्रथम शिक्षण संस्था-शाळा दिल्या जाणार. व्यापाराचे एक तत्त्व आहे- पैशाकडे पैसा जातो. त्या चालीवर ज्यांनी या उद्योग, व्यवसाय गुंतवणूक केली आहे व ज्यांनी आपले विस्तार-कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांना प्राधान्य. बळी तो कान पिळी म्हणतात ते हेच. एकदा व्यापार करायचे ठरले की व्यापाराचे म्हणून शास्त्र आहे, कमी गुंतवणुकीत अधिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६५