पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षणाचे चिंताजनक व्यवसायीकरण


पार्श्वभूमी :
 महाराष्ट्रातील औपचारिक शिक्षणाची पद्धत तेराव्या शतकापासून दिसून येते. तत्पूर्वी शिक्षण हे गुरूकुल, धर्मपीठे इत्यादीमार्फत होत असे. मुसलमानी शासकांच्या काळात (इ. स. १२०० ते १३००) अनेक गावांत लेखन, वाचन, अंकज्ञान घोकंपट्टीने शिकविणाच्या तात्यापंतोजी पद्धतीच्या शाळा होत्या. छत्रपती शिवाजी व पेशव्यांच्या काळात परकीय आक्रमणे कमी झाल्याने शिक्षणात स्थैर्य आले. ब्रिटिश आमदानीत एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सर्वप्रथम मन्रो या ब्रिटीश अधिकाऱ्याने मद्रास प्रांताचा शैक्षणिक अभ्यास करून भारतातील सार्वत्रिक शिक्षणाचा विचार रुजवला. मुंबई इलाख्यापुरते बोलायचे झाले तर गव्हर्नर मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनने मातृभाषा व इंग्रजीचे शिक्षण प्रचलित केले, शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके त्याच्याच काळात अस्तित्वात आली. पेशवाईपासून ब्राह्मणांना देण्यात येणारा रमणा बंद करून शिक्षणासाठी त्याने त्याचा वापर करून दक्षिणा फंड सुरू केला. अनुदान व शिष्यवृत्तीची परंपरा त्यातून सुरू झाली. पूर्वी वाई, पैठणसारख्या तीर्थस्थळी संस्कृत शाळा असत, तशा आता गावोगावी सर्वांना शिक्षण देणाच्या शाळा सुरू होऊन शिक्षणाचे सार्वत्रिकरण सुरू झाले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्व शाळा या देवळे, धर्मशाळा, वाडे अशा ठिकाणी भरत. शिक्षक व विद्यार्थी सवर्ण असत. वंचितांच्या शिक्षण व कल्याणाचा विचार ब्रिटिश मिशनरींकडून प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी सुरू केला, तोवर स्त्री शिक्षणाचा विचारही नव्हता. शिक्षण सर्व जाती, धर्म, वर्ग यांना अनिर्बंधपणे सुरू झाले ते मात्र विसाव्या शतकात.
 एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात (मुंबई इलाख्यात) १७०० शाळा होत्या, त्यात ३५००० विद्यार्थी शिकत. या शतकात सामाजिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६३