पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुणात्मक परिणाम व परिणामाचे निदर्शक बनत असल्याने शिक्षणात तिच्या नेतृत्व विकासावर भर द्यायला हवा, तसे झाले तरच आपण स्त्री-पुरुष समानतेचे लक्ष्य गाठू शकू.
सत्त्व आणि 'स्व'त्व
 मनुष्य जीवनात सकारात्मकतेचे जितके महत्व आहे, तितकेच महत्व 'स्व'त्वचे आहे. स्त्रिमध्ये उपजत सर्जकता, संवेदना आणि सकारात्मकता असते, त्याला 'स्व'त्वाची जोड देणारे स्वयंप्रकाशी शिक्षण मिळाले तर स्त्रिचा समग्र व संपूर्ण विकास शक्य आहे. ते आपल्या नवशिक्षणाचे अंतिम ध्येय व धोरण असायला हवे.
 या साऱ्या बाबी प्रसंगी तात्त्विक वाटल्या तरी व्यावहारिक गरज म्हणून जर आपण त्यांच्याकडे पाहू लागू तर मग आपल्या लक्षात येईल की शिक्षणाचा आकृतीबंध ठरवताना जी गृहितके आजवर आपण अंगिकारली, त्यांची नवी मांडणी, पुनर्रचना करायला हवी, तरच अपेक्षित समानतेचे लक्ष्य आपण गाठू शकू. "Education of women is important not only from the angle of equal education opportunity between the sexes but also for the substantial social and economic returns to female education that can be achieved by rising women's productivity and income level, producing better educated and healthier children and reducing fertility rate." शिक्षणातील स्त्री सहभागासंदर्भात युनेस्को वा अन्य शिक्षण तज्ज्ञांचा हा दृष्टिकोन तिच्या बदलत्या भूमिकेचेच निदर्शक आहे.

•••

संदर्भ :-

 • World Women-2010-unstates.un.org
 • Census India-2011-www.census.gov

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६२