पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली. त्यानुसार २ वर्षांच्या उच्च माध्यमिक शिक्षण स्तराचा ५०% अभ्यासक्रम हा व्यावसायिक शिक्षणाचा (Vocational Education) करणे अपेक्षित होते.
 नवीन आकृतिबंधानुसार पाचव्या योजना काळात उच्च माध्यमिक स्तर सुरू झाला खरा, पण ५०% व्यावसायिक शिक्षणाला आवश्यक आर्थिक तरतूद करणे शक्य न झाल्याने हा स्तर सामान्य शिक्षणाचा (General Education) होऊन बसला, तो आजअखेर तसाच आहे. नाही म्हणायला काही उच्च माध्यमिक शाळांमधून किमान कौशल्य अभ्यासक्रम सुरू आहेत, पण त्यांची स्थिती आय.टी.आय. पेक्षा वेगळी नाही.
 भारतात सन १९९० मध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर जागतिकीकरणाला गती आली. त्या वेळी या स्तरावर आमूलाग्र बदल अपेक्षित होता. पण त्या वेळी आपण प्राथमिक शिक्षणावर भर दिला. परिणामी आज व्यावसायिक शिक्षण ही उच्च शिक्षणाची मालकी होऊन राहिली आहे. सन २०१४ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील ६४% लोकसंख्येसह २० ते ३५ वयोगटातील म्हणजेच कार्यक्षम वा कार्यरत लोकसंख्या (Working Force) आहे. ती सन २०२० पर्यंत ३० सरासरी वर्षांची होईल. हे मनुष्यबळ अमेरिका व चीनला मागे टाकणारे ठरेल असे असून आपण या कार्यरत लोकसंख्येचे (युवा लोकसंख्येचा) कुशल मनुष्य बळात (Skilled Labor) रूपांतर करू न शकल्याने ही लोकसंख्या आपल्या देशातील बेकारांची फौज झाली आहे. सन १९९० मध्ये युरोपमध्ये असताना मी तेथील उच्च माध्यमिक संस्था (Lycee Schools) पाहिल्या होत्या. त्या शाळात या स्तरावर अनेक प्रकारचे अभ्यासक्रम होते. मला आठवते त्यानुसार स्थापत्य, वैद्यकीय, शेती, शिक्षण, विधी, वाणिज्य, विज्ञान इत्यादी सर्वच विद्याशाखात दोन-तीन वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम करून विद्यार्थी ड्रॉफ्टस्मन, ओव्हरसियर, सुपरवायझर, प्लंबर, कार्पेंटर, गार्डनर, नर्स, प्रयोगशाळा साहाय्यक, प्रोग्रॅमर म्हणून बाहेर पडत. नोकऱ्यांबरोबर स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या शक्यता व क्षमता पाहून मला आपल्या पुस्तकी शिक्षणाचे व्यर्थपण जाणवले होते, आज या घटनेस २५ वर्षे उलटून गेली, तरी आपल्या उच्च माध्यमिक स्तरावर बदल होऊ नये याला काय म्हणावे? मधल्या काळात आपण स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. मुली, युवती मोठ्या संख्येने शिक्षित झाल्या. स्त्री मनुष्य बळ विकासाचे कोणते स्वतंत्र अभ्यासक्रम आपण निर्माण केले? सन १९९६ मध्ये जपानने स्त्री शक्ती विकासाचे धोरण अंगिकारलेले मी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४३