पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. आपल्याकडे इ, ५ वी ते इ. ७ वी हे तीन वर्ग प्राथमिक शाळांतही आहेत नि माध्यमिक शाळांतही. खरे तर नवा कायदा काटकसरीच्या विचाराने केल्याने तो अविवेकी ठरला. शिवाय अशैक्षणिक ही त्याचे दुष्पपरिणाम सध्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावर दिसून येत आहेत. खरे तर नवा कायदा स्वीकारून शिक्षणाचे समायोजन, पुनर्रचना होणे अपेक्षित होते. शासनाने ते आस्थापना समायोजन मानून शिक्षक विभाजन / समायोजन करून हात झटकले आहेत. कायद्याने इ. १ ली ते इ. ८ वी प्राथमिक शिक्षण झाल्यावर प्राधान्याने अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके बदलणे अनिवार्य होते. आता येथून पुढे ती प्रक्रिया होईल. पण संरचना दोष मात्र कायम राहणार, हे उघड सत्य होय.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३१