पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चैतन्यदायी ! असेही पाहण्यात आले आहे की मुले केवळ मध्यान्ह भोजनाच्या आमिषाने शाळेत येतात. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या संदर्भातील हे सत्य आपणास नाकारता येणार नाही. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गळती व स्थगिती (Wastage and Stagnation) हा देखील आपल्या प्राथमिक शिक्षणातील एक गंभीर प्रश्न आहे. प्राथमिक स्तरावरील शिक्षण रंजक, प्रभावी, सर्जनात्मक, आनंददायी, प्रयोगशील करण्यास आपणास भरपूर वाव आहे. पण अद्याप आपले तिकडे लक्ष नाही. शिक्षक व विद्यार्थ्यांतील सुसंवाद ही देखील अलीकडच्या काळातील मोठी समस्या होते आहे. शिक्षकांची उपक्रमशीलता, लेखन, संशोधन, वाचन, माहिती व तंत्रज्ञान प्रावीण्य हे वर्तमान शिक्षकांचे कौशल्य असायला हवे. पण त्यांचा वाढता अभाव यांमुळे शिक्षक भूमिकेवर समाज प्रश्नचिन्ह उभे करताना आढळतो.
 ज्या समाज वर्गातील मुले शिक्षण वंचित आहेत, त्या समाजाच्या निरक्षरतेबरोबरच दारिद्र्याचा प्रश्न भयंकर आहे. मोलमजुरी करणारे, भटके वर्ग, स्थलांतरित कुटुंबे पाहता त्यांना अपत्य हे कमाईचे साधन म्हणून आवश्यक असते. बालमजूरच नव्हे, तर घरकाम, घर सांभाळणे, व्यवसाय यासाठी मुले त्यांना उत्पन्न साधन म्हणून हवी असतात. अशा वर्गाच्या आर्थिक उन्नतीशिवाय त्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे कठीण. हा भावनिक प्रश्न नसून ती एक त्या समाज वर्गाची आर्थिक गरज म्हणून पाहणे आवश्यक आहे. याच्या बळी त्या वर्गातील मुली पहिल्या होतात, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. लिंग समानतेचा प्रश्न जगण्याच्या समान संधीशी आपण जोवर जोडणार नाही, तोवर वास्तविक समानता रुजणार नाही. आपल्या शैक्षणिक प्रश्नांची मुळे जगण्याच्या संघर्ष व समस्येशी भिडलेली आहेत.
 हे सारे जागतिक पार्श्वभूमीवरील भारतातील सर्वसाधारण प्राथमिक शिक्षणाचे चित्र. भारतात प्रांतनिहाय प्राथमिक शिक्षणाची स्थिती भिन्न आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वर्तमान प्राथमिक शिक्षण अनेक दृष्टींनी संक्रमण अवस्थेत आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच्या काळात आपणाकडे विना अनुदान शिक्षण पद्धती सुरू झाली. पूर्वी आपल्याकडे शासकीय प्राथमिक शाळा होत्या. त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकांमार्फत चालविण्यात येत होत्या. त्याशिवाय खासगी शाळा होत्या. त्यांना अनुदान होते. स्थानिक स्वराज्य संस्था संचालित प्राथमिक शाळा व खासगी प्राथमिक शाळा यांचे अनुदान

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२९