पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राथमिक शिक्षण : प्रगती आणि प्रश्न


 अलीकडेच सर्व शिक्षा अभियान संबंधीचा सन २०१५ चा जागतिक अहवाल वाचण्यात आला. प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतो. जगात प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना केवळ शैक्षणिक सुविधा असा एकांगी विचार केला जात नाही. बालकांवर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा विचार करून ते शिक्षणाचा आराखडा, ध्येय, उद्दिष्टे निश्चित करत असतात. बालकांचे जन्म-मृत्यू प्रमाण, आहार, आरोग्य सुविधा, कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती यांच्या पायाभूत सुविधांची रचना करण्यास जग प्राधान्य देते, त्याचे कारण सरळ आहे, मुले जगली तर ती शाळेत येणार, ती सुदृढ राहिली तर शिकणार, असा तार्किक पण शुद्ध व्यवहारी विचार ते करतात. बालविकासास जोडून ते शिक्षण विचार करतात. आपण अजून या अंगाने मागासच आहोत.
 सन २०१५ च्या 'सर्व शिक्षा अभियान' (Education For All) अहवालानुसार आपणास जागतिक पातळीवर बाल मृत्यू प्रमाण कमी करण्यात ५०% यश हाती आले, तरी जगात २०१३ साली ५ वर्षांखालील सुमारे ६० लक्ष बालके मृत्युमुखी पडली. आपण बालकांच्या आहाराचा दर्जा उंचावण्यात चांगले यश संपादन केले हे खरे आहे, तरी जगातील १/४ बालके अद्याप कुपोषित आहेत, हे आपण विसरता कामा नये. तरी आपण १८४ दशलक्ष मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा देऊन प्राथमिक शिक्षणाचा प्रसार भविष्यात होत राहील, याची खबरदारी घेतली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
 सन १९९९ मध्ये जगभर आपण 'सर्व शिक्षा अभियान' राबवायचे ठरले तेव्हा ८४% च मुले प्राथमिक शिक्षण घेत होती. आपले लक्ष्य सन २०१० साली १००% करण्याचे होत. ताज्या आकडेवारीनुसार आपण

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२७