पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या प्रगतीचे सूत्र होय. विज्ञानासारख्या प्रात्यक्षिक विषयांच्या वर्गात १६ विद्यार्थी (Batch) असतात. त्यामळे व्यक्तिगत लक्ष ठेवणे शक्य होते. अधिकांश विद्यार्थी (९३%) शाळांतूनच पदवीधर होतात. व्यावसायिक अभ्यासक्रमास सुमारे ४३% विद्यार्थी पसंत करतात, जातात. शाळेच्या वेळेत मुलांना ७५ मिनिटे सुट्टी असते, शिकताना मुले थकू, कंटाळू नये याकडे लक्ष असते. शिक्षक दर दिवशी ४ घड्याळी तास शिकवतात. आठवड्यातून दोन तास मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते. शिक्षक-विद्यार्थी प्रमाण अध्यापन गरजेवर आधारित असते. शालेय शिक्षण मोफत असते. शिक्षणाचा खर्च शासन करते. सर्व शिक्षक पदव्युत्तर शिक्षण घेतले असतात. (एम.ए., एम्.कॉम., एम.एस्सी.) तेथील पदवी, पदव्युत्तर शिक्षण खर्च अल्प असतो. शिक्षणाचा अभ्यासक्रम मार्गदर्शक असतो. प्रयोग, निवड, परिवर्तनाचे शाळेस स्वातंत्र्य असते. पहिल्या १०% गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांतून शिक्षक निवडले जातात व त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शिक्षकांचा वार्षिक पगार १५ ते १६ लक्ष रुपये (मासिक सव्वा ते दीड लाख रुपये) असतो. शिक्षकांना गुणवत्ता वेतन (Merit Pay) नसते. कारण सर्वच शिक्षक गुणवान (Meritorious) असतात, हे विशेष. शिक्षकांची गणना समाजातील उच्चभ्रू म्हणून केली जाते.(डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजीनिअर, वकील इ. सारखी)
 कोरियासारख्या गुणवत्ताप्रधान प्राथमिक शिक्षण देणाऱ्या देशातही अन्य श्रेष्ठ देशांप्रमाणे समाजशास्त्र, उद्योग, कायदासारख्या विद्याशाखांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य असते. न्यूझीलंडमध्ये शिक्षण हे जीवनाचे संवेदी व समाजशील साधन म्हणून पाहिले जाते. जपानमध्ये शिक्षण व उपजीविका तसेच उत्पादन यांची सांगड महत्त्वाची मानली जाते. चीन शिक्षणास राष्ट्रीय गरजांच्या पूर्ततेच्या नजरेतून पाहतो. या सर्व पार्श्वभूमीवर आपण शिक्षण केवळ नोकरीचे माध्यम म्हणून पाहत असल्याने जीवन आणि शिक्षणातील आपली दरी न ओलांडता येणारी आहे, याचे भान ठेवून नव्या शिक्षणाची आखणी व्हायला हवी.
 या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियासारखा देश प्राथमिक शिक्षणाकडे ज्या गृहित आणि उद्दिष्टांचा मेळ घालत शिक्षणाचा आकृतीबंध बनतो, ती दृष्टी आपण लक्षात घ्यायला हवी. प्राथमिक शिक्षणाबद्दल ऑस्ट्रेलिया विचार करताना म्हणतो की, "We believe that children are born with all of their senses ready to make meaning of their world, that they come to school with knowledge and experiences. They

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२५