पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालण्याचे भान हवे. एखादे विद्यापीठ उघडणे सोपे, बालवाडी विकसित करणे म्हणजे देशाचे नियोजन करणे, हे भान ज्या दिवशी आपणास येईल, तो सुदिन !
 भारतातील बाल शिक्षण विविध स्तरीय आहे. काही मुले अंगणवाडीत, काही बालवाडीत, काही प्ले ग्रुपमध्ये तर काही ज्युनिअर, सिनिअर के. जी. मध्ये. हे केवळ नाव वैविध्य नाही, ते स्वरूप वैविध्यही आहे! झाडाखाली भरणाऱ्या बालवाडीपासून फाईव्ह स्टार, स्पार्टेक्स मल्टिमिडिया, इंटरनेट, टचस्क्रीन बालवाडीपर्यंतचे आपले वैविध्य म्हणजे भारताचे प्रतिबिंब ! ते राहणारच. आपल्यापुढे आव्हान आहे, ते विषमता कमी करत गुणवत्ता वाढीचे. त्यासाठी राष्ट्रीय धोरण, यंत्रणा, अभ्यासक्रम, संशोधन, प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे. त्यासाठी गरज आहे 'मुले प्रथम' या मानसिकतेची ! ती आपण मनी-मानसी, जळी-स्थळी, जन-गणात रुजवू या !!

•••


संदर्भ :-
 • New Jersey Kindergarten Implimentation Guidelines/
 (April - 2011.)

 • The Power of K (June - 2007)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१