पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाले नाही. आमच्या बालवाडीत येताना, जाताना कधी कुणी रडल्या, रुसल्याचं आठवत नाही. तीच बालवाडीची खरी कसोटी असायला हवी.
 बालवाडीचे शिक्षण म्हणजे मुलांचं सामाजीकरण व स्वावलंबन. घर, आई, बाबा, ताई, दादा सोडून मित्र, मैत्रीण, शिक्षकात राहणे, रमणे. हातात हात घेऊन फेर धरणे, सगळे मिळून गाणे. गप्पा करणे, गोष्टी सांगणे. कट्टी न करणे, चिमटे न घेणे, मारामारी न करणे, आपल्या डब्यातला खाऊ मित्र-मैत्रिणींना देणे, गोळी, चॉकलेट, बिस्कीट वाटून खाणे, हात पाय स्वत: धुणे, पुसणे, शीऽऽ, सूऽऽ करणे, पाणी मारणे, सगळे स्वतः हळूहळू करणे, शिकणे. अंक, अक्षर ओळख, गिरवणे, उच्चारणे. चित्रे काढणे, चिकटवणे, फाडणे, कापणे, रंग ओळख, स्वर संगती लावणे. कपड्याच्या घड्या घालणे, बिछाना घालणे, गुंडाळणे, ठेवणे, वर्ग लावणे, आवरणे, मांडणे, आजच्या संदर्भात संगणक सुरू करणे, बंद करणे शिकवणे, क्लिक, माउस, कट, पेस्ट, सिलेक्ट, फॉरवर्ड शिकणे. व्हिडिओ गेम खेळणं, टी.व्ही. पाहणे, गाणी ऐकणे, व्हिडिओ रेस, गेम्स, पझल्स, सेटस्, पत्ते, क्रिकेट, टेनिस व्हर्च्युअल खेळणे आणि मैदान, मातीत पण लंगडी, लपंडाव, गलोरी, घसरगुंडी खेळणे. सापशिडी, व्यापार, बँक, पोस्ट, एटीएम्, पैसे काढणे, दार उघडणे सारे, सारे शिकणे म्हणजे बालवाडी. बालवाडी शिक्षण म्हणजे स्वत:ला विसरणे व दुसऱ्यात, समाजात रमणे, शिकणे. स्वतंत्र, स्वप्रज्ञ होणे. वस्तू, वास, चव, रंग, आकार, अंक, अक्षर, शब्द, बोलणे साऱ्याची मोडतोड, जुळवाजुळव म्हणजे बालशिक्षण. मुलांच्या चेहऱ्याचे भाव हेच त्याचं प्रगती पुस्तक व शिक्षक कौशल्याचा आरसापण तोच!
 बालवाडी पंचवीस मुला-मुलींची हवी. किमान पाच खोल्या हव्यात. पाच शिक्षिका हव्यात. त्या बाल शिक्षणातील किमान डी.टी.एड्., बी.एड्. हव्यात. विदेशात बालवाडी शिक्षिका पीएच्.डी. पण असतात. बालवाडीस डॉक्टर, आहार तज्ज्ञ, संगीत शिक्षक, बालमानसशास्त्र, शिक्षणतज्ज्ञ जोडलेले हवेत. शिक्षिका गायन, वाचन, शिक्षण, अभिनय, नृत्य, नक्कल इत्यादीत तरबेज हव्यात. त्या समाजशील, मातृमुखी हव्यात. बालवाडीत शिक्षकपण हवेत. ते मारकुटे नसावेत. जरब नको, जाणीव हवी. बालवाडी म्हणजे खेळकर खेळघर हवे. शाळा नंदनवन, स्वर्ग असायला हवी.
 तीन वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींनाच बालवाडीत प्रवेश दिला जावा. आपणाकडे पालक फार घाई करतात. बालवाडी शिक्षण दोन, तीन वर्षांचे हवे. पहिले वर्ष सामाणिीचे. दुसरे वर्ष स्वावलंबनाचे, तिसरे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९